घरBudget 2024Maharashtra Budget Session : मुंबई आयुक्तांची बदली करा, वर्षा गायकवाड यांची विधानसभेत...

Maharashtra Budget Session : मुंबई आयुक्तांची बदली करा, वर्षा गायकवाड यांची विधानसभेत मागणी

Subscribe

मुंबईच्या विकासासंदर्भातील प्रस्तावावर बोलताना काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मुंबई : सरकारचा पैसा हा पार्टी फंड म्हणून खर्च केला जात आहे. ‘डिप क्लिनिंग’ मुळे स्वच्छ अभियानाच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे, असा आरोप करत काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी आज (ता. 28 फेब्रुवारी) विधानसभेत केली. मुंबईच्या विकासासंदर्भातील प्रस्तावावर बोलताना वर्षा गायकवाड यांच्याकडून ही मागणी करण्यात आली. तर आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांचे नाव न घेता केला. ज्यानंतर सत्ताधाऱ्यांनी यावर हरकत घेत गोंधळ घातला. (Maharashtra Budget Session: Transfer Mumbai Commissioner Iqbal Singh Chahal, Varsha Gaikwad’s demand in Legislative Assembly)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांसाठी विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

- Advertisement -

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या टेंडरसंदर्भातील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. मनपाकडून वर्षभर कोणतेही टेंडर काढण्यात आले नाही. परंतु, गेल्या 10 वर्षांत 150 कोटींचे 900 टेंडर काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे मुंबईकरांचा हा पैसा 10 दिवसांत वाटे लावण्यात आला. त्यामुळे या प्रकरणांमध्ये आयुक्त नेमके काय करत आहेत? ते फुकट बसले असतील तर त्यांच्यावर कारवाई करा किंवा त्यांची बदली करा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे.

तर, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांना घाबरवून ठेवण्यात आले आहे, असा आरोप करत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, चहल यांना एकदा चौकशीला पाठवून त्यांना घाबरवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता शासन त्यांना जे काही सांगत आहेत, त्याप्रमाणे ते वागत आहेत, असेही गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, त्यांच्या या आरोपानंतर भाजपा आमदार आशिष शेलारांनी हरकत घेतली.

- Advertisement -

आयुक्त इकबाल सिंह चहल यांना नेमके कोणी घाबरवून ठेवले आहे, असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. आमदार गायकवाड याच्याकडे याबाबतचा कोणता पुरावा असेल तरच त्यांनी बोलावे, अशी विनंती शेलारांकडून करण्यात आली. तर, आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव आहे किंवा त्यांच्यावर कोणीतरी दबाव टाकत आहे, हे चुकीचे आहे. कारण मनपा आयुक्त चहल हे स्वतः प्रशासक आहेत. त्यांना स्वतंत्र प्रशासक म्हणून नियमाने काही अधिकार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -