घरमुंबईपत्नीला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी बॉम्बची अफवा

पत्नीला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी बॉम्बची अफवा

Subscribe

पत्नीला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन करुन सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या पतीला सहार पोलिसांनी अटक केली. मोहम्मद वासीम कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे.

पत्नीला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन करुन सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या पतीला सहार पोलिसांनी अटक केली. मोहम्मद वासीम कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे.वासीम हा विदेशी नागरिक असून त्याने एका फिलीपाईन्स देशाच्या महिलेशी दोन वर्षांपूर्वी विवाह केला होता. सध्या ते दोघेही गोरेगाव परिसरात राहत होते. शुक्रवारी या दोघांमध्ये क्षुल्लक कौटुंबिक वादातून कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याची पत्नी फिलीपाईन्सला जाण्यासाठी निघाली होती.

हवाई गुप्तचर विभागाला फोन

रागाच्या भरात घरातून निघाल्यानंतर ती छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी वासीमने रात्री साडेआठ वाजता हवाई गुप्तचर विभागाला फोन करुन सिंगापूरला जाणार्‍या एका महिलेकडे कोट्यवधी रुपयांचे सोने आहे. ही महिला सोन्याची तस्करी करणार आहे, तिच्यावर कारवाई करा अशी माहिती दिली होती. ही माहिती प्राप्त या अधिकार्‍यांनी विमानाच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र विमानाला थांबवून सर्व प्रवाशांची झडती घेणे शक्य नव्हते. हा प्रकार वासीमच्या लक्षात येताच त्याने पुन्हा विमानतळावर फोन करुन सिंगापूर विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

- Advertisement -

मग बॉम्बची अफवा

बॉम्बशोधक नाशक पथक, एटीएस, सीआयएसएफच्या जवानांनी या विमानाला थांबवून सर्व सामानाची तसेच प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. सुमारे पाच तास बॉम्बचा शोध सुरु होता. बॉम्बच्या अफवेने इतर विमानाला उशीर होत होता. पाच तास संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच सहार पोलिसांच्या एका विशेष पथकाने गोरेगाव येथून वासीमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा कॉल केल्याचे सांगितले, पत्नीला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी त्याने कॉल केला, मात्र ती विदेशात निघून गेली असेही त्याने सांगितले. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -