घरफिचर्सचला मोदक खायला

चला मोदक खायला

Subscribe

हॉटेलमध्ये बसून तुम्ही अख्खा मोदक तोंडात टाकला आणि आजूबाजूला कोणी खवय्या असेल तर तो तुमच्याकडे अशा नजरेने बघतो की, तुम्ही किती मोठे पाप केले आहे. पण एक सांगतो, मोदक खायचा असेल तर त्याचा संपूर्ण आनंद घेत, हळूहळूच तो खायला हवा.

गणपतीचा उत्सव म्हणजे सर्वत्र उत्साह, आनंदाचा काळ असतो. यावेळी शक्यतो कोणी हॉटेलमध्ये जात नाही. पण मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. येथे कामानिमित्त येणार्‍यांची संख्या जास्त आहे. याशिवाय हौसेमौजेखातर हॉटेलमध्ये जाणारेही काही कमी नाहीत. पुन्हा गणपती सर्वांच्याच घरी येतो असे नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळातही मुंबईची हॉटेल तुडुंब भरलेली असतात. काही लोक तर केवळ आळसापोटी किंवा मदत करायला कोणी नाही म्हणून हॉटेलमधून गणपतीसाठी नैवेद्यही मागवत असतात. अशा सर्वांची मुंबईतील हॉटेल ऐन गणेशोत्सवाच्या काळात विशेष काळजी घेतात. या हॉटेलमध्ये गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदक, ऋषीची भाजी आणि इतर पदार्थही विपुल प्रमाणात उपलब्ध असतात.

पुन्हा चवही जिभेवर दिर्घकाळ रेंगाळणारी. त्यामुळे काही लोक तर या उकडीच्या मोदकांसाठी संकष्टी, चतुर्थीची वाट बघत असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. घराशिवाय उकडीचे लुसलुसीत मोदक खायचे असतील तर गिरगावातील तांबे, पणशीकर, विनय, दादरमधील प्रकाश, आस्वाद, जिप्सी, पणशीकर ही हॉटेल आहेत. येथील चव थोडीशी इथे तिथे असली तरी सर्वच एकच. त्यामुळे यापैकी कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन आपण उकडीच्या मोदकांची भूक भागवू शकतो. उकडीच्या मोदकावर तुपाची धार सोडून ते खाण्याची मजाच काही वेगळी असते.

- Advertisement -

पुन्हा हे मोदक खाताना एकदम अख्खाच्या अख्खा तोंडात घालायचा नाही. तो हळूहळू तुकडा तोडून खावा लागतो. हॉटेलमध्ये बसून तुम्ही अख्खा मोदक तोंडात टाकला आणि आजूबाजूला कोणी खवय्या असेल तर तो तुमच्याकडे अशा नजरेने बघतो की, तुम्ही किती मोठे पाप केले आहे. पण एक सांगतो, मोदक खायचा असेल असे तर त्याचा संपूर्ण आनंद घेत, हळूहळूच तो खायला हवा. या हॉटेलमध्ये गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदक, तळलेले मोदक असे बर्‍याच प्रकारचे मोदक मिळतात. त्यासाठी मुंबईकर हॉटेलमध्ये गर्दी करतात. मग चला तर यावर्षी खास उकडीचे मोदक खायला या हॉटेलमध्ये जाऊ.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -