घरगणेशोत्सव २०१८लाडक्या बाप्पासाठी मोदकांच्या २१ पाककृती

लाडक्या बाप्पासाठी मोदकांच्या २१ पाककृती

Subscribe

यंदाच्या गणेशोत्सवाला नक्की करून बघा हे मोदकाचे काही खास प्रकार.

जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतशा गृहिणी बाप्पासाठी गोड-धोड प्रसाद बनवण्याच्या तयारीला सुरुवात करतात. बाप्पाला आवडणारे मोदक हा खास पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून बनवला जातो. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीचे मोदक बनवण्यापेक्षा त्यात थोडा वेगळेपणा आणला तर त्याची लज्जत आणखीनच वाढेल आणि गणपतीनिमित्त घरी येणार्‍या पाहुण्यांना तुमच्या हातचे बनवलेले नाविन्यपूर्ण मोदकाचा प्रसाद देऊन कौतुकही होईल. मग वाट कसली बघताय.

केळ्याचे मोदक: सोललेली केळी, ओले खोबरे, दुध, गुळ घालून मिश्रण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यावे. त्या पेस्टमध्ये वेलची पावडर आणि रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हाताला थोडे तूप लावून त्याचे मोदक बनवावेत. मंद आचेवर (तेलात/तुपात) मोदक सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत.

- Advertisement -

 बेक केलेले मोदक : खोबरं, किसमिश, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे.

तांदळाचे गुलकंदी मोदक : तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या.

- Advertisement -

 चॉकलेटचे मोदक : खवा, खोबरं, दाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा व एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सर्व्ह करा.

उपवासाचे मोदक : गूळ आणि दाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिश घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिश, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे.

खव्याचे मोदक : हा प्रकार अगदी कमी वेळात आणि बनवण्यास सोपा आहे. खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करावे.

गूळ कोहळ्याचे मोदक : हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातील. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.

 पुरणाचे मोदक : पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेता येतात.

फ्रुट मोदक : वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रुट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

 मिक्स मेवा मोदक : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

 काजु-मनुकांचे मोदक : मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

 तीळगुळाचे मोदक : गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावेत किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावेत.

 खोबरं मैद्याचे मोदक : रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

कॅरामलचे मोदक : पनीर, खवा, काजू, किसमिश, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सर्व्ह करावा.

 काजू कतलीचे मोदक : काजू कतलीचे सारण घेऊन यामध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

 फुटाण्यांचे मोदक : फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.

 बटाटयांचे मोदक : बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिश घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी.

 बेसनाचे मोदक : बेसनाच्या लाडवाच्या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा व मध्ये एक एक काजू भरावा.

 डिंकाच्या लाडवाचे मोदक : डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

उकडीचे मोदक : तांदळाची उकड तयार करून त्यात ओलं खोबरं व गूळ याचे सारण भरून मोदकाचा छान आकार देऊन वाफवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -