घरमुंबईमराठा समाजाचे तरुण उद्धव ठाकरे यांच्या भेटीला!

मराठा समाजाचे तरुण उद्धव ठाकरे यांच्या भेटीला!

Subscribe

या भेटीदरम्यान 'निरपराध मराठा तरुणांवरील आणि माता-भगिनींवरील गुन्हे तातडीने मागे घ्या', अशी मागणी उद्धव यांनी सरकारकडे केली.

मराठा मोर्चाच्या समन्वय समितीने आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मराठा मोर्चाच्या मागण्या, मोर्चाची सद्य स्थिती, मराठा तरुणांचे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी
”मराठा समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण केल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर आणि माता-भगिनींवर हे सरकार सणासुदीच्या काळात कायद्याचं खोटं विघ्न आणत आहेत. यातून मराठा समाजाची सुटका करा”, अशी टीका केली. याशिवाय ‘वातावरण बिघडायच्या आत परिस्थिती वाईट व्हायच्या आधी मराठा समाजाला न्याय द्या’, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला सुनावलं.


वाचा : राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नये – उद्धव ठाकरे

Maratha community yougsters had meeting with uddhav thackeray
उद्धव ठाकरे भेटीदरम्यान मराठा समाजाच्या तरुणांशी संवाद साधताना

”मराठा समाजाने मोर्चे शांततेत काढले गेले होते. मात्र, राज्य सरकारने दुर्लक्ष केलं. त्यामुळे संतापलेल्या मराठा समाजातील तरुण आणि माता-भगिनी या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी ठोक मोर्चे निघाले. मात्र, काही समाजकंटकांनी यामध्ये घुसत तोडफोड केली आणि त्यामुळे निरपराध मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान ”काही दिवसांनंतर या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र, ते पाळलं गेलं नाही”, असा आरोपही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटीदरम्यान केला. ‘शिवरायांचा मावळा असं काम करू शकत नाही, त्यामुळे ज्यांच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, निरपराध मराठा तरुणांवरील आणि माता-भगिनींवरील गुन्हे तातडीने मागे घ्या’, अशी मागणी उद्धव यांनी सरकारकडे केली.


वाचा: नागराजसह रिंकू आणि आकाशचा मनसेत प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -