घरमहाराष्ट्र'तर कोरेगाव-भिमा हिंसाचार टाळता आला असता!'

‘तर कोरेगाव-भिमा हिंसाचार टाळता आला असता!’

Subscribe

कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजितच असून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी लोकांच्या भावना भडकवल्या असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच, पोलिसांनी गाफीलपणा दाखवला नसता, तर हे सर्व टाळता आलं असतं, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भिमा परिसरामध्ये दलित बांधव आणि मराठा बांधवांमध्ये उसलळलेल्या दंगलीला पोलिसांचा गाफीलपणाच कारणीभूत होता, अशी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. यासंदर्भात तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या सत्यशोधन समितीने त्यासंदर्भातला अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सोपवला आहे. या अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. याशिवाय कोरेगाव-भीमामधील हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचा महत्त्वपूर्ण मुद्दाही या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता या अहवालावरून मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

‘संभाजी भिडे, एकबोटेंनी भावना भडकवल्या’

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर सरकारने या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सोमवारी आपला अहवाल पुण्याच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला. या अहवालामधून वरील धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात नमूद केल्यानुसार मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी हिंसाचार होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यातच पोलिसही या सर्व प्रकरणावर गाफील राहिले. म्हणूनच हा पूर्वनियोजित हिंसाचार उसळल्याचंही अहवालाच नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष

याशिवाय, अहवालामध्ये संभाजी महाराजांच्या समाधीविषयीही उल्लेख करण्यात आला आहे. संभाजी महाराजांच्या समाधीजवळच्या फलकावर गोविंद गायकवाड यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, गैरहेतूने हा फलक हटवून त्याच्या जागी चुकीची माहिती असलेला दुसरा फलक लावण्यात आला, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका चुकीची असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. हा सर्व प्रकार घडत असताना पोलीस जर वेळीच सावध झाले असते, तर हे सर्व टाळता आलं असतं. मात्र, पोलिसांनी गाफीलपणा दाखवला, संभाव्य धोक्याबद्दल येणाऱ्या फोन कॉल्सकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं अहवालात नमूद केलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – भिडे गुरूजींची बंगाली जादू ! संततीप्राप्तीसाठी आंबा खाण्याचा सल्ला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -