घरताज्या घडामोडीमुंबईतील कचरा,आपत्ती व्यवस्थापनाचे अंटानानारिवोच्या महापौरांकडून कौतुक

मुंबईतील कचरा,आपत्ती व्यवस्थापनाचे अंटानानारिवोच्या महापौरांकडून कौतुक

Subscribe

'अंटानानारिवो' चे महापौर फ्रँक मायकल नायना आंद्रियांसीथायना यांनी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट दिली

मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेली वन लागवड आदी बाबी प्रशंसनीय आहेत. अंटानानारिवो शहरासाठी या सर्व बाबी शिकण्यासारख्या आहेत, असे गौरवोद्गार मादागास्कर देशातील राजधानीचे शहर असलेल्या ‘अंटानानारिवो’ चे महापौर फ्रँक मायकल नायना आंद्रियांसीथायना यांनी काढले आहेत. त्यांनी मंगळवारी शिष्टमंडळासह मुंबई महापालिका मुख्यालयास आज भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे गौरवोद्गार काढले. मुंबई महापालिकेने केलेल्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी, आंद्रियांसीथायना यांच्यासमवेत कार्यालय प्रमुख  गाय रझाफिन्ड्रालॅम्बो, केंद्र सरकारच्या अखत्यारितील इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या प्रादेशिक संचालक  रेनू प्रीथियानी हे उपस्थित होते. याप्रसंगी, पालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी आंद्रियांसीथायना व त्यांच्या सहकाऱयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आंद्रियांसीथायना व त्यांचे सहकारी शिष्टमंडळ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारीच त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतर आज या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयास भेट देऊन पुरातन वारसा असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीची पाहणी केली. यावेळी, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी, मुंबई शहराबाबत आणि या शहरात मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, जनहितार्थ राबविण्यात आलेले व प्रस्तावित प्रकल्प आदींबाबतची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली.

- Advertisement -

तर, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे यांनी घनकचरा व्यवस्थापन, दारिद्र्य निर्मूलन, कोविड कालावधीमध्ये महापालिकेने बेघर,गरीब-गरजू, कामगार आदींसाठी केलेले अन्न वितरण इत्यादींबाबत सादरीकरण केले.
अंटानानारिवो हे मादागास्करमधील सर्वात मोठे आणि राजधानीचे शहर आहे. मुंबई महानगराच्या तुलनेत या शहराचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या अत्यंत कमी असली तरी मादागास्कर मधील मोठे शहर म्हणून अंटानानारिवोचे आर्थिक उलाढालीत मोठे योगदान आहे. तसेच, मुंबई महापालिकेकडून शहरात राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासाठी वन लागवड आदींबाबत अंटानानारिवो शहराला खूप काही शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार महापौर फ्रँक मायकल नायना आंद्रियांसीथायना यांनी काढले.


हेही वाचा – पांढरा हत्ती ठरलेल्या स्कायवॉकबाबत श्वेतपत्रिका काढा; रवी राजांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -