घरक्रीडाPresident cup: राही सरनोबतची कमाल पिस्तुल खराब असतानाही पटकावले रौप्य पदक

President cup: राही सरनोबतची कमाल पिस्तुल खराब असतानाही पटकावले रौप्य पदक

Subscribe

पोलंड येथे सुरू असेलेल्या प्रेसिडेंट कपच्या नेमबाजीच्या भारताच्या राही सरनोबतने उत्कृष्ट कामगिरी केली राहीने पोलंडच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे

पोलंड येथे सुरू असेलेल्या प्रेसिडेंट कपच्या नेमबाजीच्या भारताच्या राही सरनोबतने उत्कृष्ट कामगिरी केली. राहीने पोलंडच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. ती २५ मीटर फेरीच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. लक्षणीय बाब म्हणजे या सामन्यात राहीची पिस्तुल खराब झाली होती. पण तिने हिम्मत न हारता प्रयत्नांची बाजी लावत रौप्य पदक आपल्या नावावर केले. भारताच्या स्टार नेमबाज राहीने अंतिम सामन्यात ३१ एवढा स्कोर केला होता. पिस्तुलच्या बिघाडीमुळे शेवटच्या दोन फेरीत तिच्याकडून काही शॉर्ट चुकीचे गेले. असे झाल्यानंतर देखील राही चांगल्या अंदाजात खेळत होती.

राहीने सलग तीन वेळा अचूक स्कोर बनवला होता. पण शेवटच्या काही फेरींमध्ये ती चांगली कामगिरी करू शकली नाही म्हणून तिला सुवर्ण पदकाला मुकावे लागले.

- Advertisement -

राहीसोबतच भारताची आणखी एक स्टार नेमबाज मनु भाकर सहाव्या स्थानावर आहे. जर्मनीच्या वेनेकँपने सुवर्ण पदक आपल्या नाववार केले. त्याने ३३ एवढा स्कोर केला. मॅथिल्डे लमोलेने २७ इतका स्कोर करत कांस्य पदक आपल्या नावे केले. राही आणि मनु भाकर यांनी पात्रता फेरीत ५८३ एवढा समान स्कोर केला. पण राही १० अंकाच्या निशाण्याच्या जवळ असल्याने ती चौथ्या तर मनु भाकर पाचव्या स्थानावर आहे.


हे ही वाचा: IPL 2022 : RCB ने मुख्य कोचची केली घोषणा; नव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -