घरमुंबईहँकॉक पुल रस्ते रुंदीकरण, महापालिकेची रहिवाशांना विश्वासात घेण्याची भूमिका

हँकॉक पुल रस्ते रुंदीकरण, महापालिकेची रहिवाशांना विश्वासात घेण्याची भूमिका

Subscribe

हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीमध्ये रस्ते रुंदीकरणामध्ये काही इमारती, घरे तसेच दुकाने बाधित होत आहे. त्यामुळे यासर्व रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्या सर्वांचे योग्यप्रकारे आणि योग्य जागी पुनर्वसन केले जावे यासाठी शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांच्या उपस्थितीत स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत बैठक घेवून रहिवाशांचे प्रश्नांचे निराकरण केले. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना व रहिवाशांना  विश्वासात घेवून पुनर्वसनाची प्रक्रिया राबवली जाईल असे आश्वासन दिले.

माझगाव भागातील प्रभाग क्रमांक २१०मध्ये हँकॉक ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या माध्यमातून रस्ते रुंदीकरणामध्ये काही इमारती आणि रहिवासी गाळे आणि दुकाने हे बाधित होत आहेत. त्यामुळे  रहिवाशांमध्ये एक भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हे वातावरण दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी भायखळ्याच्या आमदार  यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या विभागाच्या स्थानिक नगरसेविका  सोनम जामसुतकर व शिवसेनेचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने भायखळा इ वॉर्डचे  सहाय्यक आयुक्त  मकरंद दगडखेर यांच्यासमवेत बैठक पार पार पडली. या बैठकीला  सहायक अभियंता (परिरक्षण) .जगताप,  सहायक अभियंता (ब्रिज), सहायक अभियंता (रोड) तसेच म्हाडाचे कार्यकारी अभियंता सावंत आदींसह रहिवाशी  उपस्थित होते.  यावेळी झालेल्या बैठकीत, स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि रहिवाशांना विश्वासात घेऊनच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे ठाम आश्वासन इ विभागाचे सहाय्यक आयुक्त  मकरंद दगडखेर यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -