घरमनोरंजनरमा-माधव फेम पर्ण आलोकची कोरोनावर मात; करणार प्लाझ्मा डोनेट

रमा-माधव फेम पर्ण आलोकची कोरोनावर मात; करणार प्लाझ्मा डोनेट

Subscribe

पर्णने तिच्या फॅन्सना महत्त्वाचे सल्ले दिले.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची आवडती कलाकार जोडी म्हणजे पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे. रमा माधव, विहिर, यासारख्या मराठी सिनेमातून हि जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सेलिब्रिटी जोडप्याला कोरोनाची लागण झाली आहे. आता दोघेही पूर्णपणे बरे असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. विशेष म्हणजे दोघेही कोरोनामधून पूर्ण बरे झाले असून ते प्लाझ्मा हि डोनेट करणार आहे. सेलिब्रेटी कपल म्हणून आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अभिनेता आलोक राजवाडेला ताप येत होता. तसेच चव ही कळत नव्हती. कोरोनाची हि लक्षणे समोर आल्यानंतर आलोकची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.त्यामुळे पर्णनेही तिची कोरोना टेस्ट करून घेतली.त्यानंतर तिचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार आलोक आणि पर्ण घरीच क्वारंटाइन झाले होते. योग्य वेळी काळजी घेतल्यानंतर आता आलोक आणि पर्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघांनाही अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पर्णने तिच्या फॅन्सना महत्त्वाचे सल्ले दिले. ‘कोरोनातून मुक्त झाल्यानंतर आम्ही दोघेही प्लाझ्मा डोनेट करणार आहोत.घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करा,सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा.कोणत्याही वस्तूला हात लावताना सॅनिटायझरचा वापर करा. कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका’. असं पर्णने म्हटलं आहे.

- Advertisement -

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. असे कोणतेच क्षेत्र उरले नाही जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही.सिनेसृष्टीलाही कोरोनाचा खुप मोठा धक्का बसला आहे.सिनेमाच्या चित्रकरणाला परवानगी देण्यात आली परंतु त्यानंतर अनेक सेटवर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुटींग थांबवावं लागल. मराठी सिनेमासृष्टीला ही कोरानाचा मोठा फटका बसला आहे.


हेहि वाचा – मेहंदी सजली; अभिनेत्री सई लोकूरची लगीनघाई!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -