घरमुंबईरविवारी फक्त हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

रविवारी फक्त हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

Subscribe

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामाच्या डागडुजीसाठी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र या रविवारी फक्त हार्बर मार्गावरच मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावर २० फेब्रुवारीला सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी स्थानकातून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणार्‍या आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे व गोरेगावसाठी सुटणार्‍या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव व वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणार्‍या हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवर मार्गावर बोरिवली ते भाईंदर अप डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक शनिवारी मध्य रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार आहेत तर रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -