घरमुंबईपहिल्या प्रेग्नसींचा महिलांवर वाढतोय मानसिक ताण

पहिल्या प्रेग्नसींचा महिलांवर वाढतोय मानसिक ताण

Subscribe

पहिल्यांदाच आई होणाऱ्या ज्या महिलांचे वय जास्त आहे, ज्यांचा करिअर घडवण्याकडे कल आहे आणि ज्यांनी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह उपचार (एआरटी) घेतले आहेत त्यांच्यात मानसिक ताण आढळून येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

पहिल्यांदाच गर्भवती राहणाऱ्या महिलांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याचं समोर आलं आहे. आई होणाऱ्या महिलेसाठी बाळाचा जन्म हा जीवनातील उल्हासित करणारा टप्पा असला तरी या कालावधीत ती महिला शरीराने आणि मनाने थकते. डॉक्टर तज्ज्ञांच्या मते थोड्याफार प्रमाणात चिंताग्रस्त होणे सर्रास आढळते आणि पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिला गरोदरावस्थेत असताना अत्यंत तणावाखाली असतात आणि या आकडेवारीमध्ये भर पडत आहे.

गरोदरपणात शारीरिक आणि मानसिक बदल होतात. काही वेळा पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांना कदाचित नैराश्य येऊ शकते किंवा सतत काळजी वाटू शकते. कारणाशिवाय रडू येण्यासारखे स्वभावात उतार-चढाव होऊ शकतात. काही वेळा त्यांना अचानक अत्यानंद होऊ शकतो. त्याचप्रमाणे या मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि नाडीचे ठोके वाढतात. त्याचा बाळाच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे मातांनी आनंदी आणि सकारात्मक राहावे आणि त्यांनी उत्पादनक्षम वातावरणात असावे, जेणेकरून बाळाचे मन संतुलित राहील असा सल्ला डॉक्टर देतात.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विनोद विज यांनी सांगितलं की, ” पहिल्यांदा माता होणाऱ्या ७-८% महिला मानसिक तणावातून जात असल्याचे गेल्या पाच वर्षांत दिसून आले आहे. पहिल्यांदाच आई होणाऱ्या ज्या महिलांचे वय जास्त आहे, ज्यांचा करिअर घडवण्याकडे कल आहे आणि ज्यांनी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह उपचार (एआरटी) घेतले आहेत त्यांच्यात मानसिक ताण आढळून येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांनुसार गर्भधारणा करण्यासाठी एआरटीमध्ये उपचार केले जातात. यात ओव्ह्युलेशन इंडक्शन (ओआय), आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन (एआय) यासारख्या उपचारांचा समावेश आहे. अशा प्रकारचे उपचार घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय असेल ? याचा त्यांना ताण येतो. अशा महिलांमध्ये अशक्तपणा, मळमळ, उलट्या, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसून येतात. त्याचप्रमाणे त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होऊ शकतो, जो वाढत्या वयाचा एक भाग असतो.”

कोपिंग मेकॅनिझम म्हणजेच मानसिक परिस्थिती सांभाळण्याचे मार् वापरून नवमातांमधील मानसिक तणावाचे व्यवस्थापन करता येते.

- Advertisement -

आनंदी राहणं गरजेचं –

“योगासने, ध्यानधारणा, म्युझिक थेरपी यासारखी रिलॅक्सेशन तंत्रे आणि तणावास कारणीभूत ठरणारे घटक ओळखल्याने मानसिक तणावाचे व्यवस्थापन करता येऊ शकते. त्याचप्रमाणे ज्या महिलांना अशा प्रकारचा मानसिक तणाव असतो, त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. वेळेवर अशा प्रकारचा संवाद साधल्याने मानसिक तणाव हाताळण्यास मदत होते. परिस्थिती गंभीर झाली असेल तर त्या महिलेला मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची शिफारस करण्यात येते, असं ही डॉ. विज सांगतात‌.

” नवमातांमधील मानसिक ताण वाढत जाताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत अशा महिलांची संख्या किमान १० टक्क्यांनी वाढली आहे. वाढणारे वय, वेदना सहन करण्याची कमी झालेली क्षमता, बैठी जीवनशैली, स्थूलपणामुळे होणारा मधुमेह, हायपरटेन्शन आणि आयव्हीएफ प्रसूतीसारख्या इतर घटक यासाठी कारणीभूत आहेत.”- डॉ. पुजा बांदेकर, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, वाडिया हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -