घरमुंबईम्हाडाची नाशिक लॉटरी पंधरवड्यात

म्हाडाची नाशिक लॉटरी पंधरवड्यात

Subscribe

म्हाडाच्या नाशिकमधील १२०० घरांची लॉटरी सोडत येत्या पंधरा दिवसांत जाहीर करण्यात येईल. संपूर्ण लॉटरी प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे, याबाबतची घोषणा करू अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. म्हाडाच्या ११९३ घरांची सोडत प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सध्या कोकण आणि मुंबई मंडळासारखीच ही लॉटरी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. नाशिकच्या याआधीच्या लॉटरी प्रक्रियेत काही घरांची विक्री झाली नव्हती. त्यामुळेच नव्या लॉटरी प्रक्रियेत या घरांचा समावेश करण्यात येणार आहे. याआधी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आयटी विभागाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करून लॉटरी प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या १२०० घरांसाठीची नाशिकमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने लॉटरी पद्धत राबविण्याचा म्हाडा प्राधिकरणाचा मानस आहे.

नाशिकप्रमाणेच सहा शहरात गृहनिर्माणाचे मेगाप्रकल्प सुरू करण्याचे सामंत यांनी जाहीर केले आहे. त्यामध्ये सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. मार्च २०२२ पर्यंत २६ लाख घरे बांधण्याचे राज्य सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी १२ लाख घरांच्या बांधणीसाठी परवानगी मिळाली आहे. गरजूंना परवडणारी अशी घरांची किंमत असलेली घरे म्हाडाच्या लॉटरीत उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा उद्देश आहे. मुंबई आणि कोकण परिमंडळात याआधी म्हाडाच्या इमारती बांधकामात ठराविक विकासकांची मक्तेदारी होती. पण ही मक्तेदारी आता मोडीत काढत एकाच प्रकल्पात अनेक विकासकांना कामे देण्याचा प्रयत्न म्हाडाकडून सुरू झाला आहे. त्यामुळे म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात ठराविक विकासकांची तयार झालेली मक्तेदारी मोडीत निघणार आहे.

- Advertisement -

म्हाडाच्या नाशिक लॉटरी प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ दिवसांत लॉटरी प्रक्रियेची घोषणा करण्यात येईल.

-उदय सामंत, अध्यक्ष, म्हाडा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -