घरमुंबईभिवंडीत खड्यांच्या विरोधात एमआयएम आक्रमक; कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

भिवंडीत खड्यांच्या विरोधात एमआयएम आक्रमक; कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

Subscribe

सळधार पावसामुळे शहरातील रस्ते हे खड्डेमय झाले असून हे खड्डे भरण्यास महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून हे खड्डे भरण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते हे खड्डेमय झाले असून गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपलेला असताना शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. त्यामुळे एमआयएम पार्टीचे शहर अध्यक्ष शादाब उस्मानी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील खड्डे भरण्याचे आगळेवेगळे आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला आहे. या अंदोलनात शहर सचिव अँड अमोल कांबळे, हमजा सिद्दीकी, फैज खान, अयान शेख, रसूल खान, अनिस शेख, नदीम अन्सारी, इम्रान शेख यांसह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मुस्लिम कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात गणेश मुर्तीना खड्ड्यांचा त्रास होऊ, नये यासाठी कल्याणरोड लकडा मार्केट, नवीवस्ती या रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवून खडतर प्रवास सुकर केला आहे.

खड्डे भरण्यासाठी कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

शहरातील रस्ते हे खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याने शहरात रस्ते कमी खड्डे अधिक अशीच परिस्थिती झाली आहे. हिंदू धर्मियांचा प्रवित्र गणेशोत्सवाचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे, तरी रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने आणि सार्वजनिक गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या मुर्त्या सजावट मंडपमध्ये दाखल होण्यास पंधरा दिवस आधीच सुरवात झाली आहे, असे असतानाही प्रशासन निष्क्रिय असून त्यामुळे जर एखाद्या खड्ड्यामुळे मुर्तीस अघटित घडल्यास त्यास सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून एमआयएम शहराध्यक्ष शादाब उस्मानी यांनी केला आहे. तसेच आम्ही या विरोधात आंदोलन करणार होतो. परंतु निगरगट्ट प्रशासनासोबतच सत्ताधारी काँग्रेस पक्षावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याने नाईलाजास्तव आम्ही पुढाकार घेऊन हे खड्डे भरो आंदोलन करीत असल्याची जळजळीत टीका शादाब उस्मानी यांनी केली आहे.

- Advertisement -

तर भिवंडी शहरातील हिंदू मुस्लिम धर्मियातील एकोप्याचे दर्शन या निमित्ताने घडविण्याचा प्रयत्न एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून केला जात असल्यानेच गणेशोत्सव प्रसंगी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे सचिव अँड अमोल कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – गणेशोत्सव येतोय,खड्डे बुजवून मोनो,मेट्रोचे मार्ग व्यवस्थित करा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -