घरमुंबईगणेशोत्सव येतोय,खड्डे बुजवून मोनो,मेट्रोचे मार्ग व्यवस्थित करा

गणेशोत्सव येतोय,खड्डे बुजवून मोनो,मेट्रोचे मार्ग व्यवस्थित करा

Subscribe

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे प्रशासनाला निर्देश

श्रीगणरायांच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डयांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेवून प्रशासनाने ते पूर्ण भरुन घ्यावे,असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका प्रशासनाला दिले.याबरोबरच महापालिका व पोलिस प्रशासन यामध्ये योग्य तो समन्वय ठेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवतानाच मोनो व मेट्रोची कामे सुरु असलेल्या मार्गांवर श्री गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन मार्ग व्यवस्थित व्हावे म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात,असेही निर्देश महापौरांनी दिले आहेत. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ व अन्य मंडळे तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी महापालिका मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी खड्ड्यांसह रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची दखल घेवून प्रशासनाला सूचना करतानाच धोकादायक उड्डाणपुलांवरुन ये-जा होणार्‍या श्री गणेशमूर्तींबाबत कोणत्याही दुर्घटना होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. नागरिकांसाठी तसेच त्यांच्या परिवारांसाठी गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच असतो. हा गणेशोत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी सर्वांनी मिळून उत्साहाने हा उत्सव साजरा करुया, असे प्रतिपादन महापौरांनी केले. यावेळी महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात येणार्‍या गणेशोत्सव – २०१९ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर विश्वनाथ महाडेश्वर व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते पार पडले.

- Advertisement -

या बैठकीस उप महापौर हेमांगी वरळीकर, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली नाईक, ‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष अनिलपाटणकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल, प्रविण दराडे, ए. एल.जर्‍हाड, डॉ. अश्विनी जोशी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच ेअध्यक्ष नरेश दहिबांवकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती (पश्चिम उपनगरे) खजिनदार अशोक पटेल, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, बृहन्मुंबई मुर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तेंडुलकर, श्री गणेशोत्सवाचे समन्वयक व उपायुक्त नरेंद्र बर्डे तसेच सर्व परिमंडळीय उप आयुक्त व संबंधित सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख व पालिका अधिकारी तसेच मुंबई पोलिस, वाहतूक पोलिसचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -