घरमुंबईट्रॅफिक जॅमकडे वाहतूक पेालिसांचे दुर्लक्ष!

ट्रॅफिक जॅमकडे वाहतूक पेालिसांचे दुर्लक्ष!

Subscribe

वाहतूक पोलीस केवळ टोईंग व्हॅन घेऊन वाहन चालकांकडून चिरीमिरी गोळा करण्यात मग्न असून त्यांना वाहतूक कोंडी दूर करण्यास वेळ नसल्याचा आरोप आमदारांनी केला

कल्याणातील वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक व नागरिकंना नेहमीच करावा लागत असतानाच रविवारी रात्री कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड हे सुध्दा वाहतूक कोंडीत अडकून पडले. अखेर आमदाराने स्वतः गाडीतून खाली उतरून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत केली. वाहतूक पोलीस केवळ टोईंग व्हॅन घेऊन वाहन चालकांकडून चिरीमिरी गोळा करण्यात मग्न असून त्यांना वाहतूक कोंडी दूर करण्यास वेळ नसल्याचा आरोप आमदारांनी केला.

हेही वाचा – बाप्पाच्या आगमनासाठी ढोलपथक सज्ज!

वाहतूक पोलिसांवर ठाणे मॅरेथॉनची जबाबदारी

कल्याण पूर्वेतील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूलावर रविवारी रात्री ९च्या सुमारास एक वाहन बंद पडल्याने पूना लिंक रेाडवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक आमदारही वाहतूक कोंडीत अडकून पडले. अखेर आमदारांनी खाली उतरून कार्यकर्त्यां समवेत वाहतूक केांडी दूर केली. वाहतूक कोंडीत रूग्ण्वाहिका अडकून पडली होती. अखेर त्या रूग्णवाहिकेला वाट करून देण्यात आली. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पेालीस नसल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक शाखेला फोन करून कळविण्यात आले. रविवारी ठाणे मॅरेथॉन असल्याने बहुतांशी वाहतूक पोलिसांची ठाणे येथे नेमणूक करण्यात आली होती. मात्र वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीत वॉर्डनही नव्हते. ८.३० ते रात्री १० वाजेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले होते. कल्याणच्या पत्रीपुलामुळे वाहन चालक अगोदरच मेटाकुटीला आले असतानाच आता कल्याण पूर्वेतही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नागरिक खूपच त्रस्त झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -