घरमुंबईतांत्रिक बिघाडामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प

Subscribe

वाशी नाका ते म्हैसूर कॉलनीजवळ ही मोनोची वाहतूक ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प झाली आहे. वाशी नाका ते म्हैसूर कॉलनीजवळ ही मोनो ठप्प झाली होती.  वाशी नाका परिसरात मोनोरेल बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. ही वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशी तासाभरापासून मोनोमध्ये अडकले होते. या मोनोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

- Advertisement -

यावेळी अगिनशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अगिनशमन दलाचे जवानांच्या मदतीने मोनोमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाने आतापर्यंत ३८ जणांना शिडीचा वापर करून मोनेरेलमधून रेस्क्यू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या मोनोरेलला दुसर्‍या मोनो ट्रेनने टो करून यार्डात नेण्यात आले आहे. दुपारी एक वाजता मुंबई मोनोची ही ठप्प झालेली वाहतूक पुर्ववत होण्याची होणार असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -