घरमुंबईनवी मुंबईः उघड्या वायरमुळे झाला ब्लास्ट; तरूण गंभीर जखमी

नवी मुंबईः उघड्या वायरमुळे झाला ब्लास्ट; तरूण गंभीर जखमी

Subscribe

या तरूणाची प्रकृती गंभीर असून हा तरूण महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यूशी झुंज देत आहे

गेल्या काही दिवसांत महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे तसेच बेजबाबदारपणामुळे अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी महावितरणाचे खांब कोसळण्याच्या घटना समोर आल्यात तर कधी रस्त्यावर तार तुटून पडल्याने काहीचा जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या आहे. असाच एक प्रकार शनिवारी कोपर खैरणे सेक्टर पाचमध्ये घडला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्य़ांकडून शुक्रवारी कोपर खैरणे सेक्टर पाचमध्ये काम करण्यात आले होते. यावेळी त्याच्याकडून वीजेची तार उघडी सेडण्यात आली होती. शनिवारी सकाळी कॉलेजला जात असताना २० वर्षीय शुभमचा वीज पुरवठा सुरू असलेल्या तारेच्या संपर्कात आला आणि त्याच्या कपड्यांना आग लागली.

कोपरखैरणेतील महावितरणाच्या एका वायरला लागलेल्या आगीत मुलगा जखमी, व्हिडीओ व्हायरल

कोपरखैरणेतील महावितरणाच्या एका वायरला लागलेल्या आगीत मुलगा जखमी, व्हिडीओ व्हायरल

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 23, 2019

- Advertisement -

अशी घडली घटना

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सेक्टर पाच मध्ये राहणारा शुभम जगदीश सोनी शनिवारी सकाळच्या वेळी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडला. पण, महावितरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला हायव्होल्टेज करंट असलेल्या वायरचा स्फोट झाला. त्या स्फोटात रस्त्यावरून जाणाऱ्या शुभमला त्या वायरचा स्पर्श झाला. या वायरच्या संपर्कात येताच त्याच्या शरीरावरील कपड्यांना आग लागली आणि शुभम या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. 

शरिरावरील कपड्य़ांना आग लागल्यानंतर तशाच आवस्थेत घरी जात असताना या २० वर्ष असणारा तरूण शुभमला स्थानिक नागरिकांनी मदत केली. या तरूणाच्या शरिराला आग लागल्यानंतर त्याला नवी मुंबई महानगर पालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अजून देखील या तरूणाची प्रकृती गंभीर असून हा तरूण महावितरणाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यूशी झुंज देत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -