घरमुंबईमोनोरेलची सेफ्टीराईड चाचणी मंगळवारी

मोनोरेलची सेफ्टीराईड चाचणी मंगळवारी

Subscribe

सुरक्षाविषयक पडताळणीसाठी मोनोरेल अधिकारी करणार पाहणी. सुरक्षित वाटल्यास लवकरच मोनोरेल होणार सुरू. मनसेद्वारे अधिकाऱ्यांना निवेदन.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी एमएमआरडीए ने मोनोरेलचा घाट घातला. सुमारे २४०० कोटींचा रूपयांचा रतीब घालून मोनोरेल सुरू झाली. पण सततच्या अपघातांनी ती कधी सुरळीत धावलीच नाही. रडत आणि रखडत का होईना मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण कार्यान्वयीत झाला. मात्र नोव्हेंबर २०१७ ला लागलेल्या आगीत मोनोरेलचे दोन रेक जळून खाक झाले. सुदैवाने कोणतेही जिवीत नुकसान तेव्हा झाले नाही हे मुंबईकराचे नशिब. तेव्हापासुन मोनोरेलचा पहिला टप्पाही बंद झाला होता. विधानसभेत राज्यसरकार ने पुन्हा एकदा नवीन डेडलाईन दिली होती. आता आवश्यकत्या सुधारणा आणि सुरक्षाविषयक बदल करून १ सप्टेंबर २०१८ पासुन मोनोरेलचा पहिला टप्पा वडाळा-चेंबुर पुन्हा सुरू होत आहे. या डेडलाईनच पत्र मनसे रस्ते-आस्थापना विभागाचे शिष्टमंडळा ला मोनोरेलचे मुख्य अधिकारी डॉ. डी. एल. एन. मुर्ती (प्रमुख, परिवहन व दळणवळण विभाग) यांनी दिलं आहे. या बैठकीला उपाध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष योगेश चिले, उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे, प्रभाग संघटक संदिप राणे, प्रभाग संघटक बिपीन शिखरे, प्रभाग संघटक दिनेश उपस्थित होते.

मनसेच्या मागण्या

मोनोरेल कधी सुरू होणार हे लेखी स्वरूपात द्यावे.

- Advertisement -

मोनोरेलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची लेखी हमी द्यावी.

मोनोरेलची सद्यस्थितीचे संपुर्ण विश्लेषण करावे.

- Advertisement -

नोव्हेंबर २०१७ च्या अपघातानंतर कॉन्ट्रॅक्टर एल अँड टी–स्कोमी यांच्यावर काय कार्यवाही केली याची माहीती द्यावी.

ऑनबोर्ड कम्युनिकेशन सिस्टिमची सद्यस्थिती काय आहे…?

सध्याच्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर सुरू असलेले डिस्प्युट तसेच सुरू राहील्यास पर्याय काय असेल…?

यासह वैठकीत इतरही अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. करदात्यांचा पैसा वाया जावू नये आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य यासाठी ही भेट घेण्यात आली. सुरक्षाविषयक पडताळणीसाठी मोनोरेलने मनसे रस्ते आस्थापना टिमला मोनोरेलच्या स्पेशल राईडसाठी मंगळवारी आमंत्रित केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -