घरमुंबईनालासोपारा स्फोटक प्रकरणी शरद पवार बोलण्याची शक्यता

नालासोपारा स्फोटक प्रकरणी शरद पवार बोलण्याची शक्यता

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (सोमवार, दि. २७ ऑगस्ट) पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ही बैठक होणार असून, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत यावर होणार चर्चा

नालासोपारा येथे सापडलेली स्फोटके, एटीएसने आतापर्यंत केलेला तपास, नालासोपारा आणि सातारा येथे वैभव राऊत याच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले होते. या सर्व विषंयावर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक बोलवण्यात आलेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

- Advertisement -

काय आहे प्रकरण

९ ऑगस्ट रोजी एटीएसने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरातून स्फोटके जप्त केली होती. राज्यातील काही भागांमध्ये स्फोट घडवण्यासाठी ही स्फोटके गोळा केल्याचा आरोप वैभव राऊतवर आहे. वैभव व्यतिरीक्त नालासोपाऱ्यातील २५ वर्षीय शरद कळसकर आणि पुण्यातील ३९ वर्षीय सुधनवा गोंधळेकर याला देखील अटक करण्यात होती. तसेच नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार (३०) याला शुक्रवारी रात्री राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमध्ये अटक केली. बॉम्ब बनविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. राऊतसह अटक केलेल्या इतरांनी बॉम्बद्वारे विविध ठिकाणी स्फोट घडविण्याचा कट आखला होता. त्यात पवार सहभागी असल्याच्या शक्यतेतून एटीएसने तपास सुरू केला आहे. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी ही पाचवी अटक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -