घरमुंबईझाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश

झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश

Subscribe

ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवत वेगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन केलं आहे. माणसाला पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्याचे संवर्धन केले जावे यासाठी नासा या पर्यावरणवादी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

झाडं जगलं तर माणसं जगतील या उक्तीप्रमाणेच सध्या विविध ठिकाणी झाडांची जी कत्तल सुरु आहे, त्याबाबत ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवत वेगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन केलं आहे. केवळ रक्षाबंधनच नाही तर यातून विद्यार्थ्यांनी एक अनोखा संदेश दिला आहे. न्यू इंग्लिश स्कूल आणि नेचर ऍक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल अप्रोच (NASA)या पर्यावरण संस्थेच्या वतीने टाकाऊ वस्तूंबरोबर पानं, फुलं, गवत, डोरा, करवंटी अशा साहित्यातून तयार केलेल्या राख्या राममरुती रस्त्यावरील काही झाडांना बांधून झाडाचे  संवर्धन करण्याचे आवाहन ठाणेकरांना केले आहे.

Rakshabandhan
ठाण्यात विद्यार्थ्यांचं अनोखं रक्षाबंधन

संवर्धनाची जबाबदारी आता आपल्यावरच

दुर्बलांचे रक्षण करणे हा रक्षाबंधन सणाचा हेतू आहे. त्यासाठीच बहीण भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर टाकते. पण सध्या निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपल्याच खांद्यावर आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संकटात सापडलेल्या झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘तुम्ही झाडांना वाचवा, ते तुम्हाला वाचवतील’ असा संदेश दिला आहे. नौपाडा राम मारुती रोड रस्त्यावरील  झाडांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली.
नेचर ऍक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल अप्रोच (NASA) पर्यावरण संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला शाळेचे विश्वस्त आल्हाद जोशी, जल शास्त्रज्ञ डॉ प्रमोद साळसकर, मुख्याध्यापक भानुदास तुरुपमाने इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -
Raskhabandhan
ठाण्यात विद्यार्थ्यांचं अनोखं रक्षाबंधन

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

माणसांकडूनच मोठ्या प्रमाणात पर्यावरण सध्या धोक्यात आले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका बसू नये म्हणून पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती होऊन त्यांच्यामार्फत माणसाला पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्याचे संवर्धन केले जावे यासाठी नासा या पर्यावरणवादी संस्थेने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.  रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तब्बल ६० विद्यार्थ्यांनी नौपाडा राम मारुती रस्त्यावरील  झाडांना राख्या बांधून, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा आणि निसर्गाचे संवर्धन करा,  असा संदेश दिला आहे. गवत, झाडांची पाने, नारळाच्या करवंट्या, सुतळी, यांपासून टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या बांधल्या आहेत. मिकीमाऊस, पंखा, निसर्ग , झाड, अशा विविध प्रकारच्या राख्यांवर पर्यावरण वाचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारे विविध संदेश या विद्यार्थ्यांनी लिहिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -