घरमुंबईशारदाश्रम तांत्रिक विद्यालयात मातृसोहळा

शारदाश्रम तांत्रिक विद्यालयात मातृसोहळा

Subscribe

’एक दिवस स्वत:च्या अस्तित्वाचा’ नावे कार्यक्रम

मातृदिनानिमित्त शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयातर्फे आजी माजी विद्यार्थ्यांच्या मातांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या कामाच्या ताणातून थोडा वेळ काढत या मातांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शारदाश्रम विद्यामंदीर तांत्रिक विद्यालयाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्षे असून यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मातांसाठी अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यात सर्वात विशेष होते ते म्हणजे ज्या माता या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, त्यांच्या मुलांनी मातांसाठी एक गिफ्ट म्हणून ग्रिटींग कार्ड तयार केले होते. त्यात त्यांनी आपल्या मातेप्रती भावना व्यक्त केल्या होत्या. आपल्या मुलांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माताही भारावून गेल्या होत्या. यावेळी उपस्थित मातांनी आपल्या मुलांचा उत्साह पाहून शाळेचे आभार देखील मानले. या कार्यक्रमाला उपस्थित मातांनीही चांगला प्रतिसाद दिला. शिवाय, मातांनी आरोग्याची काळजी कशापद्धतीने घ्यावी याविषयी ही सल्ला देण्यात आला. मातांच्या या कार्यक्रमासाठी आजी माजी विद्यार्थ्यांचा ही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

- Advertisement -

एक दिवस स्वत: च्या अस्तित्वाचा या टॅगलाईन अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक महिलेने स्वत: च्या आयुष्यासाठी थोडासा वेळ द्यावा आणि आपले आयुष्य जगावे हे सांगण्यासाठी या मातांचा सोहळा महत्त्वाचा होता. याबरोबरच सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत मातांचे जेवणाकडे दुर्लक्ष होत असते. अशावेळी या मातांनी आपल्या जेवणाची काळजी कशी घ्यायची यासाठी आहारतज्ज्ञ मेघा आकरे यांचे मार्गदर्शन देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -