घरमुंबईमिस्टर इंडियाचा दावेदार वसईकर देवेंद्र भोईर उपेक्षितच

मिस्टर इंडियाचा दावेदार वसईकर देवेंद्र भोईर उपेक्षितच

Subscribe

चार वेळा वसई श्री शरीरसौष्ठव चषक पटकावणारा आणि मिस्टर इंडियाचा प्रबळ दावेदार असलेला वसईकर देवेंद्र भोईर आर्थिक मदतीमुळे उपेक्षित राहिला आहे. गेल्या सहा वर्षात महापालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कमागिरी करणार्‍या या खेळाडूला आर्थिक मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. सलग तीन वेळा वसई श्री, एकदा महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडियाचा दुसरा क्रमांक पटकावणारा तसेच २९ व्या वसई तालुका कला – क्रीडा महोत्सवातील शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदाही चषक पटकावणारा देवेंद्र भोईर आर्थिक विवंचनेत आहे. २०१२ पासून देवेंद्रने सलग तीनवेळा आणि आता चौथ्यांदा विजयश्री होण्याचा पराक्रम केला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना केवळ आवडीतून वसई तालुक्याचे नाव देशभरात उज्वल करण्यासाठी देवेंद्र दिवस-रात्र मेहनत घेत आहे. शरीर फिट ठेवण्यासाठी त्याला दरमहा ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. हा खर्च भागवण्यासाठी तो इतर शरीर सौष्ठवपटूंना प्रशिक्षण देत आहे.

नायगाव येथे राहणार्‍या देवेंद्रला इतर तरुण व्यायाम करताना पाहून वयाच्या १४ व्या वर्षी शरीरसौष्ठव होण्याची आवड निर्माण झाली. त्यातून १६ व्या वर्षी तो स्पर्धेत उतरला आणि ११ वर्षांनी म्हणजेच २०१२ ला त्याने वसई श्रीचा पहिला किताब पटकावला. सलग तीन वर्ष हा किताब पटकावल्यानंतर इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी ही स्पर्धा सोडली. सलग तीनदा वसई श्री, महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडियाचा दुसरा क्रमांक पटकावल्यानंतरही त्याच्याकडे वसई-विरार महापालिका आणि महोत्सवाच्या आयोजकांचे लक्ष गेले नाही. गुरू विराज सरमळकर यांचे प्रोत्साहन आणि एस. एम. फिटनेसचे मालक शुभम म्हात्रे यांच्या आर्थिक मदतीमुळे न खचता देवेंद्र आपल्या यशाची वाटचाल करीत आहे.

- Advertisement -

अखेर वसईकरांनी त्याची दखल घेतली नाही. पण, त्याची दखल कल्याणकरांनी घेतली. कल्याणच्या प्रोटीन बनवणार्‍या कंपनीने त्याला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवून प्रोटीनचे नाव देवेंद्र भोईर न्युट्रीशन असे ठेवले. ज्या व्यायामशाळेत त्याने फिटनेसचे धडे गिरवले त्या एस. एम. फिटनेस जीमनेही त्याला आपले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केले. आर्थिक सहकार्य मिळाले तर सरावावर लक्ष केंद्रित करून वसईचे नाव देशपातळीवर उज्वल करू शकेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. देवेंद्र भोईर हा चांगला शरीरसौष्ठवपटू आहे. तो वसईचे नाव देशपातळीवर चमकवत आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, आर्थिक मदतीसाठी त्याने कधी आमच्याकडे मागणी केली नाही. कला-क्रीडा महोत्सवातून चांगल्या खेळाडूंना नक्कीच मदत केली जाते, असे महोत्सवाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -