घरलाईफस्टाईलफेअरनेस क्रीम खरेदी करताना

फेअरनेस क्रीम खरेदी करताना

Subscribe

फक्त सात दिवसात गोरेपणा मिळवा’ असा गोरेपणाचा दावा करणार्‍या खूप फेअरनेस क्रीमच्या कंपन्या आहेत. पण असा दावा करणार्‍या किती कंपन्या खरंच त्यांच्या या दाव्याला खर्‍या उतरतात.फेअरनेस क्रीमबाबतीत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. फेअरनेस क्रीमच्या कोणत्या घटकाने त्वचा उजळली जाते किंवा त्यात काय घटक असतात. लेबलवर छापल्या जाणार्‍या गोष्टींमुळे तुम्हाला कळू शकते की कोणते फेअरनेस क्रीम चांगले आहे आणि तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य फेअरनेस क्रीम ओळखण्यासाठी तुम्हाला या 3 गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

अल्फा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड

अल्फा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड त्वचेचा रंग उजळवण्यास खूप मदत करतात. उसात आढळणार्‍या या पदार्थाच्या तत्वाचा उपयोग काही आयुर्वेदिक कंपन्यादेखील करतात. एएचएमध्ये मुख्यत: दोन प्रकारचे अ‍ॅसिड असतात. लॅक्टिक अ‍ॅसिड आणि गायक्लॉनिक अ‍ॅसिड. कोणत्याही फेअरनेस क्रीममध्ये या दोन गोष्टी असणे अत्यंत आवश्यक असते.

- Advertisement -

व्हिटॅमिन ‘अ’च्या संबंधित असणारे तत्व

व्हिटॅमिन ’अ’पासून बनवल्या जाणार्‍या रेटिनॉल, रेटिनल डीहाइड आणि रेटिनल पामिटेट सारखे तत्व त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करतात. हे त्वचेत कोलेजनचं प्रमाण वाढवतात, ज्यानं त्वचा निरोगी होते.

व्हिटॅमिन ‘सी’च्या संबंधित असणारे तत्व

व्हिटॅमिन ‘सी’मध्ये अल्ट्रा पोंटेंट अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे त्वचेला उजळ करतात आणि त्वचेवरील डाग दूर करतात. कोणत्याही फेअरनेस क्रीममध्ये १० टक्के व्हिटॅमिन ‘सी’ असणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -