घरमुंबईमुंबईकरांचा विमान प्रवास महागणार

मुंबईकरांचा विमान प्रवास महागणार

Subscribe

मुंबहून उड्डाण करणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या विमानाने प्रवास करणाऱ्यांना आता विमान प्रवासासाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबईच्या विमान प्रवासाचे तिकीट २० ते ५० टक्क्यांनी वाढणार आहेत.

विमान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला आता कातरी लागणार आहे. कारण यापुढे मुंबईकरांना विमान प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे ही वाढ थोडी थोडकी नसून तिकीट दरात तब्बल २० ते ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. मात्र, त्याच कारणही तसंच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्टीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

किती दिवस चालणार काम ?

दुरूस्तीच्या कामासाठी मुख्य धावपट्टी काही दिवसांसाठी दररोज ६ तास बंद राहणार आहे. त्यामुळे विमान सेवा वापरणाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे. या कामासाठी अनेक विमाणांची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विमान प्रवास करताना वेळापत्रकात होणारे बदल लक्षात घेऊनच प्रवास करावा असे, अवाहन विमान कंपन्यांनी केले आहे.

- Advertisement -

काय आहे मुख्य कारण..?

मुंबई विमानतळावरून दर ६५ सेकंदाला विमानाचे टेक ऑफ आणि लँडीग होत असते. त्यामुळे धावपट्टीवर सतत ताण येत असतो. तेव्हा दुरूस्तीसाठी सकाळी ११ ते ५ या काळात ही धावपट्टी बंद राहणार आहे. मात्र, या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या धावपट्ट्यांवर टेक ऑफ आणि लँडीग केले जाणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा मुंबई-अहमदाबाद तसेच मुंबई दिल्लीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. कारण हा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या प्रवाशांवर अतिरिक्त तिकीट दरांचा बोझा सहन करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -