घरमनोरंजनरवी पटवर्धन आणि उषा नाईक यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

रवी पटवर्धन आणि उषा नाईक यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Subscribe

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन आणि अभिनेत्री उषा नाईक यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन आणि अभिनेत्री उषा नाईक यांना यावर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित झाला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. १९७६ पासून पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी पुरस्कार प्राप्त मान्यवरांची शिफारस केली होती.

‘या’ मान्यवरांना पुरस्कार जाहीर

नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी श्रीमती उषा नाईक, कीर्तनासाठी ह. भ. प. विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं. प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादानसाठी श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे. पुरस्काराचे १ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरुप असून सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बिग बींनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -