घरमुंबईUber चालकावर लोखंडी रॉडने हल्ला

Uber चालकावर लोखंडी रॉडने हल्ला

Subscribe

प्रवाशाने सांगितलेल्या जागेवर जाण्यास नाकार दिल्यामुळे चालकाला केली बेदम मारहाण

उबर चालकावर लोखंडाच्या रॉडने हमला केल्याप्रकरणी पोलिसानी नुकतेच एकाला अटक केले. प्रवाशाने सांगितलेल्या जागेवर जाण्यास नकार दिल्यामुळे उदभवलेल्या वादातून उबर चालकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. राकेश असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे तर हल्ल्यात जखमी जालेल्या चालकाचे नाव शाहरुख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कसा घडला प्रकार

शाहरुख मागील काही महिन्यांपासून उबर कंपनीसाठी गाडी चालवतो. तो फक्त पश्चिम उपनगरातील अंधेरी ते कलिना परिसरातच प्रवाशांची वाहतूक करतो. राकेशने अंधेरीयेथून कलिनाला जाण्यासाठी उबर अॅपने गाडी बुक केली होती. त्यावेळी शाहरुख हा गाडी घेऊन त्याठिकाणी आला. गाडीत बसल्यानंतर राकेशच्या मैत्रिणीने तिला डोबिवलीला जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा शाहरुख नकार दिला. लाबं जायचे असल्यास अॅपने दूसरी गाडी बूक करण्यास त्याने सांगितले. यामुद्यावरुन यादोघांमध्ये वाद निर्माण झाला. यावादातून राकेशने याच ठिकाणी असलेल्या लोखंडाच्या रॉडने चालकाचा डोक्यात त्याने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार बसला. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांना ताब्यात घेतले. जखमी शाहरुखला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुखच्या डोक्याला बारा टाके पडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

“जे झाले ते अनपेक्षित होते. चालकाला ठरवलेल्या अंतरापेक्षा लांब जायची परवानगी नाही. यात चालकाची काही चूक नाही. आम्ही चालकामागे खंबीर उभे आहोत आणि गरज भासल्यास त्याला कायदेशीर मदतही देण्यात येईल.” – उबर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -