घरमनोरंजनअन्यायाला वाचा फोडणारं 'सत्यमेव जयते' मधील नवं गाणं

अन्यायाला वाचा फोडणारं ‘सत्यमेव जयते’ मधील नवं गाणं

Subscribe

पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्याची लढाई सुरु होते. या लढाईमध्ये अडथळा आणणाऱ्यांना संपवता संपवता जॉन अखेर खाकी वर्दीच्याच विरोधात उभा राहतो.

जॉन अब्राहमचा नवा सिनेमा सत्यमेव जयते सध्या चर्चेचा विषय आहे. भष्ट्राचार आणि देशातील अन्यायाविरुद्ध लढणारा जॉन या सिनेमात दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जॉनच्या फॅन्समध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली होती. आता या सिनेमाचे आणखी एक गाण रिलीज झाले आहे. अन्यायाला वाचा फोडणारे हे गाणे असून वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी जॉनने कंबर कसलेली बघायला मिळत आहे.

ताजेदार -ए- हरम

देशात स्त्रियांचा मान राखलाच गेला पाहिजे. या वाक्याने गाण्याची सुरुवात होते आणि त्या गाण्यातील एनर्जी तुम्हाला फील होते. जॉन या सिनेमात सिरिअल किलरची भूमिका साकारली आहे. मात्र, हा सिरिअल किलर देशात होणाऱ्या भ्रष्टाविरोधात लढा देणारा आहे.

- Advertisement -

काय आहे सिनेमाची स्टोरीलाईन

पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्याची लढाई सुरु होते. या लढाईमध्ये अडथळा आणणाऱ्यांना संपवता संपवता जॉन अखेर खाकी वर्दीच्याच विरोधात उभा राहतो. त्याच्या या संपूर्ण लढ्यामध्ये मनोज वाजपेयीचा देखील एक महत्वाचा रोल आहे. सिरिअल किलर असलेल्या जॉनला शोधणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मनोज वायपेयीने साकारली आहे.

सिनेमात दोन मराठी चेहरे 

सत्यमेव जयतेच्या ट्रेलरमध्ये दोन मराठी चेहरे आहेत. देवदत्त नागे आणि अमृता खानविलकर यांच्या या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -