घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ; १३ मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ; १३ मृत्यू

Subscribe

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मुंबई महानगरपालिकेला यश येताना दिसत असलं तरी आज रुग्णवाढीमध्ये किंचित वाढ झाली आहे. तसंच मुंबईत आज १३ जणांचाच मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ७४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख २० हजार ३५६ इतकी झाली आहे. तसंच मृतांच्या संख्येतही घट झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर रविवारी हा आकडा १३ इतका झाला. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ३९६ इतकी झाली आहे.

१२९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबईसाठी समाधानकारक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. शनिवारी ७४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना १२९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ०८२ इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्के इतके झालं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -