Mumbai Corona Update : मुंबईत आज कोरोनाचे 50 नवे रुग्ण, तर 60 जण कोरोनामुक्त

mumbai corona update great relief to mumbaikars 50 corona sufferers recorded with zero patient died
Mumbai Corona Update : मुंबईत आज कोरोनाचे 50 नवे रुग्ण, तर 60 जण कोरोनामुक्त

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने घट होच आहे. मात्र कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत आज कोरोनाचे 50 नवे रुग्ण आढळले आहेत, कालच्या तुलनेत ही संख्या 23 ने अधिक आहे. काल कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळले होते. विशेष म्हणजे आजही मुंबईत कोरोनाचा एकही मृत्यू नाही. त्यामुळे मुंबईसाठी ही दिलासाजनक बाब आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 60 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत.

मुंबईतील एकूण बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या १०५७३४० इतकी आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे.

कोरोना रुग्ण दुपटीचा दर 14 हजार पार

मुंबईत कमी आढळणाऱ्या रूग्णांमुळे कोरोना दुपटीचा दर १४ हजार ५०८ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सक्रिय रूग्णसंक्या कमी झाली असून ही आज ३२४ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या ५० रूग्णांपैकी ४ रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर ३ रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहे. पालिकेकडील २८ हजार ४६८ बेड्सपैकी केवळ १०८ बेड वापरात आहेत.

७ मार्च २०२१ ते १३ मार्च २०२२ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेड ७ हजार ३६५ इतके आहेत. मुंबईसह इतर राज्यात रूग्ण कमी आढळत असल्याने देशातही कोरोना विषाणूचा संसर्ग मंदावला आहे.