घरमुंबईMumbai Fire News : मालाडमधील शॉपिंग सेंटरमध्ये आग; 17 जण सुदैवाने बचावले

Mumbai Fire News : मालाडमधील शॉपिंग सेंटरमध्ये आग; 17 जण सुदैवाने बचावले

Subscribe

मुंबई : मालाड (पूर्व) येथील एका दुमजली शॉपिंग सेंटरमध्ये सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे शॉपिंग सेंटरमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या 17 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (Mumbai Fire News Fire at shopping center in Malad 17 people survived fortunately)

हेही वाचा – CM Shinde : अमळनेर साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, मालाड (पूर्व), जैन मंदिर रोड येथील तळमजला अधिक दोन मजली अकॅमे शॉपिंग सेंटरमध्ये मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या वृत्ताने शॉपिंग सेंटर व परिसरात खळबळ उडाली. सदर शॉपिंग सेंटरमधील इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, लकडी फर्निचर, एसी युनिटसह इतर सामान जळून खाक झाले. या आगीमुळे आणि आगीच्या धुरामुळे पहिल्या मजल्यावर 7 ते 8 जण दुसऱ्या मजल्यावर 9 जण अडकले होते.

सुदैवाने आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन आगीत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच फायर इंजिन, चार जंबो वॉटर टॅंकर, एक वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने आगीवर काही अवधीत नियंत्रण मिळविले आणि आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र शॉपिंग सेंटरमध्ये एसी युनिटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी हे आगीच्या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सदर आग रात्री 9 वाजून 22 मिनिटांनी विझविण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : काँग्रेस लोकसभेचे रणशिंग फुंकणार; महामेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबेना

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या चेंबूर येथील आरएनए परिसरात सकाळी वाजताच्या सुमारास आग लागली होती. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहान न झाल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु ही आग कशामुळे लागली? याबाबतची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -