घरमुंबईआंग्रिया क्रूझवर झाले शुभमंगल सावधान

आंग्रिया क्रूझवर झाले शुभमंगल सावधान

Subscribe

पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मुंबई-गोवा क्रूझसेवेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रवासाची आठवण खास बनवण्यासाठी प्रवाशांनी क्रूझवरच लग्न केलं.

भारतात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आंग्रिया कूझची सुरुवात करण्यात आली. मुंबई-गोवा सागरमार्गे प्रवास करणारी ही क्रूझ पर्यटकांना आकर्षीत करण्याचे विविध प्रयत्न करत आहे. मुंबई-गोवा सागरीमार्गावरुन प्रवास करण्यासाठी पर्यटकांना १४ तास लागतात. २० ऑक्टोबर पासून या क्रूझ प्रवासाला सुरुवात करण्यात आली. क्रूझ प्रवासाच्या पहिल्याच दिवशी एका कपलने क्रूझ प्रवासाचे क्षण खास बणवण्यासाठी क्रूझवरच लग्न केलं. मुंबई-गोवा प्रवासात क्रूझवर लग्न करणारे हे आतापर्यंतचे एकमेव दाम्पत्य आहे. आतापर्यंत मुंबई-गोवा प्रवास हा बस आणि ट्रेनमधून होत होता. पूर्वी बोटीने केला जाणारा प्रवास बंद करण्यात आला. मात्र पर्यटकांना पून्हा बोटीने प्रवास करता यावा यासाठी कूझ सेवा सुरुवात आंग्रिया सुरु करण्यात आली. अनेकदा जमीनीवर लग्न करणारे दाम्पत्यांनी काहीतरी वेगळा विचार करून लग्नासाठी क्रूझची निवड केली. मुंबई-गोवा प्रवासादरम्यान पहिल्यांदाच अशा प्रकारचे दृष्य बघायला मिळाले. आपला प्रवास अद्वितीय बनवण्यासाठी दाम्पत्याने क्रूझ प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कोर्ट मॅरेजनंतर लगेच सुरु केला प्रवास

प्रभीर आणि सायली कोरेया असे या दाम्पत्याचे नाव आहे. प्रभीर आणि सायलीने २० ऑक्टोबर रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज केले होते. त्याच दिवशी आंग्रिया क्रूझवर त्यांनी प्रवेश केला. लग्नाचा आनंद त्यांनी क्रूझवर केक कापून साजरी केला. यावेळी त्यांच्या बरोबर क्रूझचे कॅप्टन, त्यांच्या जवळच्या व्यक्ती आणि क्रूझचा स्टाफ होता. नवीन दाम्पत्यासाठी क्रूझकडूनही काही विशेष तयारी करण्यात आली होती. भारताच्या पहिला क्रूझमध्ये लग्न झाल्यामुळे कॅपटनला आनंद असल्याचे सांगण्यात आले. सर्वांनी या नवदाम्पत्याला पुढच्या जीवनासाठी आशीर्वाद दिले.

- Advertisement -

क्रूझची विशेषता

मुंबईत ही क्रूझ भाऊचा धक्का येथून सुटणार आहे. त्यानंतर पुढे ती सहा ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतला जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे हे थांबे आहेत. पुढे ही क्रूझ गोव्यात दाखल होणार आहे. मुंबईहून रोज संध्याकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहोचणार आहे. क्रूझमधून जवळपास ३०० जण प्रवास करू शकतात. एकेरी प्रवासाचे तिकीट भाडे ७ हजार ५०० रुपये असणार आहे. रात्रीचे जेवण तसेच नाष्टा यांचा सामावेश असेल. अंगरिया देशातील पहिली स्थानिक क्रूझ सेवा आहे. या महाकाय बोटीत स्विमिंग पूल, आठ रेस्टॉरन्ट, बार, २४ तास उघडे असलेले कॉफी शॉप असणार आहेत. बोटीमधील रेस्टॉरन्ट विवाह समारंभासाठी किंवा बड्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट बैठकांसाठीही उपलब्ध केले जाणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -