घरमुंबईअंगरियाची  गोवा सफर

अंगरियाची  गोवा सफर

Subscribe

तिकीट :रू.७५००प्रवासः१४तास

अंगरिया क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. आम्ही फक्त मुंबई ते गोवा अंगरिया क्रूझ सेवा सुरू करण्यासाठी क्रूझ कंपनीला सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. आमच्याकडे भाडे ठरविण्याची जबाबदारी नाही. ते क्रूझ कंपनी ठरवेल. – राजेंद्र पैंबीर, सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट.मुंबई ते गोवा असा आलिशान अंगरिया क्रूझमधून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ११ ऑक्टोबरपासून मुंबईकरांच्या सेवेत अंगरिया क्रूझ येणार आहे. या महागड्या अंगरियामधून प्रवास करणे सामान्य मुंबईकरांना परवडणारे नाही. कारण आलिशान अंगरिया क्रूझचे भाडे ७ हजार ५०० रुपये असणार आहे. त्यामुळे अंगरिया हा सागरी प्रवासाचा पांढरा हत्ती कोणासाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रवास किती जणांना परवडेल याबाबत बंदर अधिकारीही साशंक आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या मुंबई-गोवा क्रूझ सेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून ११ ऑक्टोबर रोजी अंगरिया क्रूझ मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे. खासगी क्रूझ कंपनीच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरू करत आहे. दिवसाआड ही सेवा असल्याने आठवडाभरात कधीही क्रूझने गोव्याच्या सफरीवर जाता येणार आहे. या क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असं बरंच काही अनुभवता येणार आहे. मात्र सामान्य मुंबईकरांना हे खेळ खूपच महागडे ठरणार आहेत. मुंबईहून गोव्यापर्यंत अंगरिया क्रूझ प्रवासासाठी जात असलेल्या प्रवाशांसाठी या प्रीमियम सेवेची किंमत साडेसात हजार इतके आहे. हे भाडे हवाई परिवहन आणि रेल्वे यासह इतर वाहतुकीच्या तुलनेत खूप महागडे आहे.
एखाद्याला मुंबई ते गोवा प्रवास विमानाने करायचा असेल तर साधारणत: १५०० ते २५०० रुपये इतके भाडे आहे. तर रेल्वेच्या एसी तिकिटाची किंमत केवळ ८०० रुपये इतकी आहे. तर बसचे तिकीट ५०० ते ८०० रुपये आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना ही अंगरिया क्रूझची सेवा परवडणारी नाही. या गोष्टीची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकार्‍यांना कल्पना आहे. मात्र खासगी कंपनीच्या फायद्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याने कोणीही याबाबत चर्चा करण्याच्या तयारीत नाही.  ही आलिशान अंगरिया क्रूझ सेवा कुणासाठी आहे. सामान्य मुंबईकरांसाठी की श्रीमंतासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

६ ठिकाणी थांबणार

मुंबईत ही क्रूझ भाऊचा धक्का येथून सुटणार आहे. त्यानंतर पुढे ती सहा ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतला जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे हे थांबे आहेत. पुढे ही क्रूझ गोव्यात दाखल होणार आहे. मुंबईहून रोज संध्याकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहोचणार आहे. क्रूझमधून जवळपास ३०० जण प्रवास करू शकतात.

प्रवास करणार्‍यांसाठी हाय-फाय सुविधा

 एकेरी प्रवासाचे तिकीट भाडे ७ हजार ५०० रुपये असणार आहे. रात्रीचे जेवण तसेच नाष्टा यांचा सामावेश असेल.  अंगरिया देशातील पहिली स्थानिक क्रूझ सेवा आहे. या महाकाय बोटीत स्विमिंग पूल, आठ रेस्टॉरन्ट, बार, २४ तास उघडे असलेले कॉफी शॉप असणार आहेत. बोटीमधील रेस्टॉरन्ट विवाह समारंभासाठी किंवा बड्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट बैठकांसाठीही उपलब्ध केले जाणार आहे.

मुंबई ते गोवा कोणता प्रवास परवडणार

हवाई वाहतूक – विमान सेवा – १५०० ते २५००-1 तास 15 मि.
लोहमार्ग एसी प्रवास – ८०० – 8 ते 9 तास
रस्ते वाहतूक – बस सेवा – ५०० ते ८०० -14 ते १5 तास
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -