घरमुंबईट्रेनमध्ये चढताना महिलेला हृदयविकाराचा झटका

ट्रेनमध्ये चढताना महिलेला हृदयविकाराचा झटका

Subscribe

पोलीस महिलेने प्रसंगावधान बाळगत महिलेला उपचारासाठी केले रुग्णालयात दाखल

आज मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना घडली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास दादर स्टेशनवर लोकलमध्ये चढताना महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी स्ट्रेचर आणि हमाल येण्याची वाट न पाहता ड्युटीवर असलेल्या पोलीस महिलेने प्रसंगावधान बाळगत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचल्यामुळे महिला पोलिसांचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

हृदय विकाराचा झटका आलेल्या महिलेचे नाव निकिता दिघे असून ती महिला गोरेगाव येथे राहणारी आहे. या घटनेनंतर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -