घरमुंबईहलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित अभियंता जबाबदार

हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित अभियंता जबाबदार

Subscribe

तांत्रिक कारणाशिवाय किंवा हलगर्जीपणामुळे फीडर बंद होऊन वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्याला जबाबदार ठरवण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज्यात वीज मीटरचा अजिबात तुटवडा नाही. मीटर उपलब्ध असताना ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच तांत्रिक कारणाशिवाय किंवा हलगर्जीपणामुळे फीडर बंद होऊन वीज पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्याला जबाबदार ठरवण्यात येईल, तसेच ही बाब संबंधित अभियंताच्या वेतनवाढीस जोडली जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. राज्यात मीटरचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना वीज जोडणी मिळत नाही आणि अंधारात राहण्याची वेळ आली असल्याबद्दल आमदार किसन काथोरे, संदीप नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर आदींनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

ग्राहकांची बिले दुरूस्त केली जातील

या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ऊर्जामंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, मध्यंतरी ४ महिने वीज मीटरचा तुटवडा होता. याचे कारण म्हणजे केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१९ पूर्वी १५ लाख १८ हजार ग्राहकांना वीज कनेक्शन दिले. त्यामुळे तेवढ्या कालावधीसाठी ग्राहकांना नवीन मिटर मिळू शकले नाही. पण कोणताही नागरिक विजेशिवाय वंचित राहिला नाही. सध्या ४८ लाख मीटर खरेदी करण्यात आली. त्यापैकी २८ लाख मीटर प्राप्त झाले आहेत. राज्यात दरवर्षी १० लाख नवीन मीटर घेतले जातात. राज्यात वीज मीटरचा अजिबात तुटवडा नाही. मीटर मिळू शकले नाही, या काळात ज्या ग्राहकांची बिले अधिक आली असतील त्यांची बिले दुरूस्त करून दिले जातील, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

- Advertisement -

…तर सहायक अभियंत्याला जबाबदार

वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा अधिकारी कर्मचारी उडवा-उडवीची उत्तरे देतात, असा अनुभव आल्याचे आमदार संजय केळकर यांनी सभागृहात सांगितले. तसेच सक्षम व्यवस्था निर्माण करणार काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, तांत्रिक कारण वगळता फीडरवरून वीजपुरवठा खंडित असल्याचे आढळल्यास संबंधित सहायक अभियंत्याच्या वेतनावाढीशी ही बाब जोडून कारवाई करण्यात येईल. महिनाभरात राज्यातील सर्व फीडर सहायक अभियंत्याच्या वेतनवाढीशी जोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. निष्काळजीपणामुळे वीज पुरवठा खंडित झाला तर सहायक अभियंत्याला जबाबदार ठरवले जाणार आहे.

हेही वाचा –

अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली

- Advertisement -

वादग्रस्त ‘डेलॉईट’ प्रकरणी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव; ‘आपलं महानगर’ने केली पोलखोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -