घरमुंबईआज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Subscribe

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशीराने धावणार आहेत.

आज रेल्वेच्य्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते अंधेरी दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बल मार्गवरील कुर्ला ते वाशीदरम्यान तर, मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण धिम्या मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर असा असणार मेगाब्लॉक

सकाळी ११.१० ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मुलुंड ते कल्याण दरम्यान, सकाळी १०.४७ ते ३.२४ पर्यंत सर्व लोकल जलद मार्गावरुन धावतील. तसेच, अतिरिक्त थांबा हा ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांना दिला आहे. कल्याण स्थानकावरुन सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर या स्थानकांवर थांबतील. मेगाब्लॉकमुळे या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तर सकाळी १०.०५ ते २.५४ वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकातून कल्याण, कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, दिवा येथे थांबतील.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवर असा असणार मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते अंधेरी या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत असेल. तसेच यावेळी बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील लोकल धिम्या मार्गावरून धावणार आहेत.

हार्बर मार्गावर असा असणार मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन दिशेकडे मेगाब्लॉकच्या काळात एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यासाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -