घरमुंबईपरदेशात नोकरीचं आमिष,बंटी-बबली गजाआड!!

परदेशात नोकरीचं आमिष,बंटी-बबली गजाआड!!

Subscribe

परदेशात नोकरीचे आमिष दाखवत १५६ जणांकडून ४१ लाख रूपये उकळणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली आहे.

‘फॉरेनला नोकरी लावतो’ असं आमिष दाखून १५६ जणांकडून ४१ लाख उकळणाऱ्या भामट्याला  नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्योत रजनीकांत गडकर असे या ४४ वर्षीय आरोपीचे नाव आहे. यापूर्वी त्याची पत्नी प्रियांका प्रज्योत गडकर हिला देखील पोलिसांनी अटक केली. बंटी- बबलीच्या जोडीनं आतापर्यंत १५६ जणांकडून परदेशात नोकरीचे आमिष दाखवून सुमारे ४१ लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटक केल्यानंतर दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मोहम्मद दिलशाद मिराज अहमद राईन हा २७ वर्षांचा तरुण वडाळा परिसरात राहत असून व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. त्याला विदेशात नोकरी करण्याची इच्छा होती, त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्याला त्याचा भाऊ मोहम्मद चाँद याने मुंबई सेंट्रल येथे मॅक्स कन्सल्टन्टची नावाची एक कंपनी असून या कंपनीने अनेकांना विदेशात नोकरी दिली आहे असे सांगितले. त्यामुळे ४ मे २०१८ रोजी मोहम्मद दिलशाद हा डॉ. डी. बी मार्ग रोडवरील नवजीवन सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील मॅक्स कन्सल्टन्टच्या कार्यालयात गेला होता. तिथेच त्याची प्रियांकासोबत ओळख झाली होती. तिने त्याला तुर्की, फ्रॉन्स आणि अन्य काही देशांमध्ये हेल्परची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. पासपोर्ट, व्हिसा, वैद्यकीय तपासणी आणि विमान तिकिट आदी कामासाठी त्याला ५५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर त्याने एका महिन्यांत प्रियांकाला ५५ हजार रुपये दिले होते. १४ ऑगस्टला मोहम्मद दिलशाद हा परदेशात नोकरी करण्यासाठी निघाला. मुंबईहून दिल्ली विमानतळावर आल्यानंतर त्याने प्रियांकाला कॉल केला. मात्र, तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याने तिच्या भावाला प्रियांकाचा ऑफिसला आणि घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. मात्र तिथे प्रियांका नव्हती. त्यामुळे तो पुन्हा मुंबईत आला होता. मुंबईत येताच त्याने त्याच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र, प्रियांका ही पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. त्यामुळे त्याने नागपाडा पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी प्रियांकासह इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीसह इमिग्रेशन कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच प्रियांका गडकर हिला पोलिसांनी अटक केली. तिच्या चौकशीत तिचा पती प्रज्योत गडकर याचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी प्रज्योतसा देखील अटक केली. या दोघांनी तब्बल १५६ जणांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ४१ लाख रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही नोकरी दिली नव्हती. प्रियांकाने नोकरीसाठी घेतलेली रक्कम त्याच्या पतीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -