घरमुंबईपरवानगी सोबत कारवाईची नोटीस; पोलिसांचा अजब कारभार

परवानगी सोबत कारवाईची नोटीस; पोलिसांचा अजब कारभार

Subscribe

कार्यक्रम साजरा करायला परवानगी शिवाय कारवाईची नोटीस. असा अजब कारभार मुंबई पोलिसांचा पाहायला मिळाला.

आता हिंदुनी सण साजरे करायचे की नाहीत? असा संतप्त सवाल सध्या युवासेनेचे उपविभाग अध्यक्ष अभिजीत पाटील विचार आहेत. त्याला कारण ठरलं आहे ते पोलिसांनी पाठवलेली नोटीस. यावेळी मुंबई पोलिसांचा अजब कारभार पाहायाला मिळाला. वरळी कोळीवाडा पोलीस स्टेशनमध्ये नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी अभिजित पाटील परवानगी मागण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. पण, त्याचवेळी त्यांना कार्यक्रमासाठी परवानगी देखील देण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी पाटील यांनी मागितली होती. पण त्यांना ध्वनीप्रदुषण अधिनियम २००० कलम ८ प्रमाणे नोटीस देण्यात आली. त्यामुळे आयोजकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

‘जाणीवपूर्वक कायद्याची बंधनं’

दरम्यान, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या हिंदुंच्या सणांवर जाणीवपूर्वक पोलीस कायद्याची बंधन घालत असल्याचा आरोप आता केला जात आहे. यावेळी परवानगी सोबत कारवाईची नोटीस देखील बजावण्यात आली. अशी माहिती युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली. यानंतर संतप्त झालेल्या पाटील यांनी इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई होणार का ? फक्त हिंदूंच्या सणांवरती कारवाई होणार ? असा सवाल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -