घरमुंबईभीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची धडक कारवाई

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची धडक कारवाई

Subscribe

भीम आर्मीची आज वरळीच्या जांबोरी मैदानात सभा आहे. या सभेसाठी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर काल मुंबईत आले. मालाड येखील मनाली हॉटेमध्ये ते थांबले आहे. मात्र काल रात्रीपासून त्यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मुंबईसह महाराष्ट्रात सभा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ३०० ते ४०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतल्या दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समतानगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी या पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सभा घेऊ नये म्हणून पोलीस आम्हाला ताब्यात घेत आहेत अशी माहिती भीम आर्मीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कालपासून नजरकैदेत असलेल्या भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा – मी सभेला जाणारच – चंद्रशेखर आझाद

- Advertisement -

चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

भीम आर्मीची आज वरळीच्या जांबोरी मैदानात सभा आहे. या सभेसाठी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर काल मुंबईत आले. मालाड येखील मनाली हॉटेमध्ये ते थांबले आहे. मात्र काल रात्रीपासून त्यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालाड येथील हॉटेल बाहेर लोकांनी एकच गर्दी केली आहे. आपण गुन्हेगार नसल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले आहे. चंद्रशेखर यांना विमानाने परत घरी जाण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहे.

अधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक

मनाली हॉटेल परिसर आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मानसी हॉटेल जवळून भीम आर्मीचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड, मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड. सचिन पट्टेबहादूर, अॅड. अखिल शाक्य, सोलापूरचे प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाली हॉटेल येथून पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -