घरट्रेंडिंगJio ची 'Happy New Year' ऑफर, वाचा फायदे

Jio ची ‘Happy New Year’ ऑफर, वाचा फायदे

Subscribe

जिओच्या या विशेष 'Happy New Year' ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास युजर्सना २८ डिसेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीतच रिचार्ज करावा लागणार आहे.

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाच्या प्रारंभी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत जिओने ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक देणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच जिओने दिलेली ही धमाकेदार ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. जिओच्या या विशेष ‘Happy New Year’ ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास युजर्सना २८ डिसेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीतच रिचार्ज करावा लागणार आहे. हा रिचार्ज करणाऱ्या युजरला AJIO या Jio च्या फॅशन रिटेल वेबसाईटवर भन्नाट डिस्काउंटही मिळणार आहे. या वेबसाईटवर रिचार्ज करणाऱ्या युजरला १०० टक्के कॅशबॅकचं कुपन मिळणार आहे.

Jio ग्राहकांना फायदा…

कूपन युझर्स AJIO वर खरेदी  करताना वापरू शकतात. हा रिचार्ज केवळ ३९९ रुपयांच्या रिचार्ज वरच लागू होणार. मात्र, रिचार्ससोबतच ग्राहकांना AJIO वेबसाईटवर १००० रुपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे. या मर्यादेपर्यंतची खरेदी केल्यास युजरला १०० टक्के कॅशबॅकच्या कुपनचा लाभ मिळणार आहे.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी…

कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Jio चे युजर्स असणं आवश्यक आहे. तुम्ही जर जिओ युजर असाल तर सर्वप्रथम ‘My Jio’ App मध्ये जाऊन ३९९ रुपयांचा रिचार्ज करा. त्यानंतर तुम्हाला ३९९ रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळेल. तुम्हाला मिळालेले कूपन तुम्ही डिओच्या ‘My Coupon’ सेक्शनमध्ये बघू शकता. ज्यावेळी तुम्ही AJIO वेबसाईटवर शॉपिंगसाठी जाल त्यावेळी तुम्ही या कुपनचा वापर करु शकाल. तुम्ही एक हजार रुपयांच्या खरेदीवर १०० टक्के कॅशबॅक मिळवू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -