घरमहाराष्ट्रपुणेMumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'या' कालावधीत आज पुन्हा दोन...

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘या’ कालावधीत आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक

Subscribe

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज (10 ऑक्टोबर) पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. (Another two hour block today during this period on Mumbai Pune Expressway)

हेही वाचा – धक्कादायक! वाशिममध्ये भरदिवसा झेडपी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉकदरम्यान आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (किमी 45/000) अमृतांजन पुल आणि (किमी 45/800) खंडाळा बोगद्याजवळ हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु राहणार आहे. एक्स्प्रेस वेवरील काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.

इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम राबवण्यात येणार

द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 340 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. यातील 115 कोटी उभारणीसाठी आणि उर्वरित 225 कोटी पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – संभाजीनगर, नांदेडमधील घटना दुर्दैवीच, पण राजकारण करू नका; उदय सामंत यांचे आवाहन

मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुपरफास्ट 

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूंना एक-एक लेन वाढविण्यात येणार आहे. लेन वाढविल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर रोज सुमारे 70 हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या महमार्गावरील प्रवास अधिक गतिमान होण्यासाठी एमएसआरडीसीने आणखी लेन वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पासाठी 5 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -