घरमुंबईMumbai : मलबार हिल जलाशयाबाबतचा अहवाल वेळेत सादर झाला नाही - मंगल...

Mumbai : मलबार हिल जलाशयाबाबतचा अहवाल वेळेत सादर झाला नाही – मंगल प्रभात लोढा

Subscribe

मुंबई : मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीबाबत आय. आय. टी. पवई यांनी अहवाल वेळेत सादर केलेला नाही, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. (Mumbai Report on Malabar Hill Reservoir not submitted on time Mangal Prabhat Lodha)

हेही वाचा – Devendra Fadnavis : मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजणारे…; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

- Advertisement -

मलबार हिल येथील पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय हा ब्रिटिश कालीन जुना जलाशय आहे. या जलाशयाची दुरुस्ती कामे करणे गरजेचे आहे. मात्र या जलाशयाची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करण्याची व त्यासाठी जलाशय व पाणीपुरवठा बंद ठेवण्याची गरज नाही. तसेच, जलाशयाच्या कामासाठी तेथील उद्यानालाही धक्का लावण्याची गरज नाही, असे मत स्थानिक नागरिक व पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडले होते. तसेच, जलाशयाच्या दुरुस्तीसाठी आय. आय. टी. पवई यांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करावी, मोठी दुरुस्ती करावी किंवा नाही, याअनुषंगाने पुनर्विचार करण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल महापालिका प्रशासनाकडे अद्याप पूर्णपणे सादर झालेला नाही. त्यामुळे मलबार हिलचा दुरुस्तीचे काम प्रलंबित राहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले; वडेट्टीवारांचा आरोप

मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्ती कामासाठी महापालिकेतर्फे आय. आय. टी. मुंबईचे संरचना, जलशास्त्र, भूरचनाशास्त्र या विषयांचे चार तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच तीन स्थानिक नागरिक व महापालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीने मलबार हिल जलाशयाची दोन वेळा पाहणी केली असून त्यांनी आपले निष्कर्ष काढले आहेत. मात्र त्यांचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल वेळेत सादर करण्यात आलेला नाही, असे पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -