घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले; वडेट्टीवारांचा आरोप

Vijay Wadettiwar : 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले; वडेट्टीवारांचा आरोप

Subscribe

मुंबई : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी, निमसरकारी  नोकरीत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक आज (20 फेब्रुवारी) विधिमंडळात एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले. आरक्षण देताना राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची अट घातली आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती उन्नत तसेच प्रगत गटात मोडणाऱ्या नाहीत, अशा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील व्यक्तींना या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल, असे विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले आहे, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. (10 percent reservation given without any basis Vijay Wadettivars allegation)

हेही वाचा – Jitendra Awhad : ऐतिहासिक निर्णय चर्चेविना पारित झाला; आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक झाली आहे. महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नाही, असा आरोप विजय वडेट्टीवर यांनी केला आहे.

सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही, आमच्या मराठा समाज बांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

- Advertisement -

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची आणि माझी भूमिका मी वेळोवेळी मांडली आहे. आज दिलेले 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

हेही वाचा – Politics : वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांचे ‘नवा दादा’ नावाने बॅनर

आरक्षण प्रश्नी फसगत करणारं फसवं सरकार

महायुतीचे सरकार बळीराजाची फसगत करणारं फसवं सरकार आहे. बेरोजगार युवक-युवतींची फसगत करणारं फसवं सरकार आहे. परीक्षार्थी उमेदवारांची फसगत करणारं फसवं सरकार आहे. जुमलेबाजी करणारं जुमलेबाज सरकार आहे. मलिदा खाणारं फसवं सरकार आहे. गॅरेंटीच्या नावाखाली फसगत करणार नो गॅरेंटी सरकार आहे. आता आरक्षण प्रश्नी फसगत करणारं फसवं सरकार म्हणून नवी ओळख या सरकारला मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -