घरदेश-विदेशमुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा भारतात येणार? गृहमंत्री म्हणतात...

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा भारतात येणार? गृहमंत्री म्हणतात…

Subscribe

‘मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक तहव्वुर राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली असून आता या प्रकरणाबाबत काय करायचे, याचा निर्णय केंद्र शासन आणि पोलीस यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार घेईल’, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकेत अटक झाल्यानंतर सह्याद्री गेस्ट हाऊस येथे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांच्यात तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप तहव्वूर राणावर आहे. मूळचा पाकिस्तानी-कॅनडियन वंशाच्या तहव्वूर राणाला अमेरिकेने यापूर्वीही अटक केली होती. दोन दिवसांपूर्वीच शिक्षा भोगून बाहेर आलेल्या राणाला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. यावर ट्रम्प प्रशासनाने राणाचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच प्रत्यार्पणासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राणाला अमेरिकेत २०१३ मध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. डिसेंबर २०२१ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका होणार होती. पण त्यापूर्वीच त्याला सोडण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, तहव्वुर राणाला सोडल्यानंतर दोनच दिवसात अटक करुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यर्पणाची मागणी केली होती. याबाबतचे प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -