घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे ११९७ नवे रुग्ण, आज ७५ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे ११९७ नवे रुग्ण, आज ७५ मृत्यू

Subscribe

मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढतच असून लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोनाचे रुग्ण अजूनच वाढत आहेत. आज दिवसभरात मुंबईत ११९७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ६५ हजार २६५ इतकी झाली आहे. त्याशिवाय मुंबईत आज तब्बल ७५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याशिवाय १६ जूनपूर्वी ज्या मृत्यूंची नोंद नॉन कोविड म्हणून झाली होती, अशा ६१ मृतांची देखील भर पडली आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १३६ इतका झाला असून आता मुंबईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा ३ हजार ५५९ इतका झाला आहे. ६१० रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३२ हजार ८६७ इतकी झाली आहे.

mumbai letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -