घरमुंबईमाझेही मत ...

माझेही मत …

Subscribe

एका मतात 5 वर्षांचे भविष्य

होय मतदान करावे पण नाईलाज किंवा भावनिक होऊन नाही,तर एक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य म्हणून. कारण तुमच्या एका मतामुळे तुमचे आणि एकूण समाजाचेच पुढील 5 वर्षाचे भविष्य मतपेटीत बंद होते.देशातील रस्ते,पाणी आणि इतर मूलभत गरजांसाठी मतदान करावे असे मला वाटते.आपले एक मत देशातील युवा पिढीचे आयुष्य उज्ज्वल करू शकते.देशाचे संरक्षण हा मुद्दा महत्वाचा असला तरी देशातील समस्यांवर देखील नागरिकांनी मतदान करावे.आपल्या मतदार संघातून एक सामाजिक जाण असलेला व्यक्ती निवडून देणे हे आपल्या सर्वांचे एक नागरिक म्हणून कर्तव्यच आहे.मतदान करा कारण नेते हे देशाचे मालक नसून सामान्य नागरिक या देशाची ताकद आहे.लोकशाही बळकट करायची असेल तर हक्काने मतदान करा. – अक्षय सावंत,विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ

- Advertisement -

लोकशाहीच्या भविष्यासाठी मतदान करा

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा सार्वभौम अधिकार आहे. त्यामुळे या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने करावा.चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे.ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही गरजेचे आहे.त्यामुळे मतदान टाळू नये.मतदान करताना उमेदवाराची,त्याच्या पक्षाची पार्श्वभूमी तपासावी.त्या उमेदवाराने आतापर्यंत मतदारसंघासाठी कोणते योगदान दिले आहे ते तपासावे आणि आपले मत द्यावे.तरच आपण देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जावू शकतो. – नामदेव बनकर,केशव गोरे ट्रस्ट

- Advertisement -

…तर चुकीची व्यक्ती लोकप्रतिनिधी असेल

मतदान एक ताकद आणि संविधानाने आपल्याला दिलेला एक अधिकार आहे . मतदान एक कर्तव्य आणि समाजाप्रती ऋण आहे. मतदानामुळे लोकप्रतिनिधी/समाजासाठी एक सेवक निवडला जातो . देशाला किंवा समाजाला योग्य प्रतिनिधी मिळाला तर विकास निश्चित आहे आणि ते मतदानामुळे शक्य आहे. मतदान नाही केले आणि चुकीची व्यक्ती लोकप्रतिनिधी असेल तर परत मतदान करण्यासाठी पुढील ५ वर्षे वाट पाहावी लागते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जास्त प्रमाणात मतदान झाले तर चांगले भविष्य आणि विकास सुनिश्चित आहे. मतदानामुळे आपले नागरिकत्व सुरक्षित राहते.एक सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार निवडून यावा यासाठी आपण मतदान करावेच. तर माझ्यामते वरील गोष्टींचा विचार करून आणि कोणत्याही आमिषांना न भुलता मतदान केले तर ते चांगल्या ठिकाणी जाईल व एक चांगले योगदान ठरेल. – दिपीका परब,विद्यार्थीनी, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -