घरमुंबई'Eastern Free Way' ला विलासराव देशमुख यांचे नाव द्या; अस्लम शेख यांची...

‘Eastern Free Way’ ला विलासराव देशमुख यांचे नाव द्या; अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

पत्राद्वारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पूर्व मुक्त मार्गास (Eastern Free Way) माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील मागणी करणारे एक पत्र शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

अशी केली पत्राद्वारे मागणी

अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असे लिहिले की, मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. तसेच या फ्री वेची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील ‘पी डीमोलो रोड पासून ते चेंबुर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोचपावती असेल, असेही अस्लम शेख यांनी पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.

- Advertisement -

मुंबईच्या पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा इत्यादी स्थानांसोबत एका जलद दुव्याने जोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. MMRDA ने तीन टप्प्यांमध्ये या मार्गाचे काम हाती घेतले. १२ जून २०१३ रोजी पी. डि’मेलो रस्ता ते चेंबूरच्या पांजरपोळापर्यंतचा १३.५९ किमी लांबीचा टप्पा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. १६ जून २०१४ रोजी उर्वरित भागाचे काम पूर्ण झाले व संपूर्ण १६.८ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग वापरात आला.


दिलासा! भारतातील Corona चाचण्या अंतिम टप्प्यात; डिसेंबपर्यंत येणार लस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -