घरताज्या घडामोडी'गरज पडली, तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन', राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!

‘गरज पडली, तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन’, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनावरून सत्ताधारी आणि विरोधक अर्थात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सातत्याने सुंदोपसुंदी सुरू असताना या सगळ्या कोलाहलात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनपेक्षित अशी शांततेची भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना आज राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन वाढीव वीज बिलांचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. तसेच, ‘हे सरकार कुंथत कुंथत चालतंय. असं सरकार चालवता येत नाही’, असं म्हणत आपण पुन्हा Action Mode मध्ये आलो असल्याचा इशारा दिला. राज्यासमोरचे हे मुद्दे सोडवण्यासाठी जर गरज पडली, तर मुख्यमंत्रांनाही भेटेन, असं देखील राज ठाकरेंनी सांगितलं. राज्यपालंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘कोरोनाच्या काळात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीतही लोकांना अव्वाच्या सव्वा बिलं येत आहेत. लोकं बिलं भरणार कुठून? त्यामुळे या बाबतीत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की वीजबिलं कमी करू. पण MERC ची मान्यता हवी. MERC म्हणतंय कंपन्या वीज बिलांवर निर्णय घेऊ शकतात. आमचं त्यांच्यावर दडपण नाही. मग राज्य सरकारला हे सगळं माहिती असताना सरकार अडलंय कशावर, हेच माहिती नाही. यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिलं आहे. त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायचा सल्ला दिला आहे. शरद पवारांशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेट घेईन. आणि गरज पडली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेईन’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर यावेळी राज ठाकरेंनी ताशेरे ओढले. ‘मुंबईत प्रश्नांची कमी नाही. विद्यार्थ्यांचे प्रवेश अडकलेत. रेल्वे अजूनही सर्वांसाठी सुरू नाही. महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत. वाहतूक कोंडी आहे. हॉटेलं सुरू झालीत, पण मंदिरं बंद आहेत. प्रश्नांची कोणतीही कमी नाही. तर निर्णयाची कमी आहे. सरकार का कुंथतंय? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही’, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला.


हेही वाचा – वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरे यांची राज्यपालांशी चर्चा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -