घरमुंबईऑनलाईन पध्दतीने पार पडणार; ४४८ पदांची परीक्षा प्रक्रिया

ऑनलाईन पध्दतीने पार पडणार; ४४८ पदांची परीक्षा प्रक्रिया

Subscribe

नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य आणि अग्निशमन विभागामध्ये विविध संवर्गातील ४४८ पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्यावतीने ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेऊन करण्यात येत आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या आकृतीबंधाला महाराष्ट्र शासनाची मंजूरी मिळाली असून आरोग्य आणि अग्निशमन या महत्वाच्या विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीस मंजूरी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने या सेवा अधिक सक्षम होण्याकरता महापालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य आणि अग्निशमन विभागामध्ये विविध संवर्गातील ४४८ पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत १६, १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत.

राज्यातील ५५ केंद्रांवर परीक्षा सुरु 

या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ५५ केंद्रांवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. ही परीक्षा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक पध्दतीने पार पडावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिले असून ऑनलाईन प्रक्रियेमुळे ही परीक्षा मानवी हस्तक्षेपाविना सुनियोजित पध्दतीने पार पडणार आहे.

- Advertisement -

या पदांसाठी परीक्षा प्रक्रिया 

संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ५५ केंद्रांवर आरोग्य विभागाच्या स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (१३० पदे), प्रयोगशाळा तंत्रज्ञान (४ पदे), ई.सी.जी. तंत्रज्ञ (७ पदे), रक्तपेढी तंत्रज्ञ (३ पदे), ऑक्झिलरी नर्स / मिडवाईफ (३२ पदे), शस्त्रक्रियागृह (१२ पदे) अशा ६ संवर्गातील एकूण १८८ पदांकरीता तसेच अग्निशमन विभागाच्या विभागीय अग्निशमन अधिकारी (१ पद), अग्निशमन केंद्र अधिकारी (२ पदे), अग्निशमन प्रणेता (१० पदे), अग्निशामक (२०८ पदे), वाहनचालक – अग्निशमन (३९ पदे) अशा ५ संवर्गातील एकूण २६० पदांकरता म्हणजेच एकूण ४४८ पदांकरीता ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक केंद्रावर एका निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.

आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन परीक्षा

महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशमन या विभागांचे कामकाज अधिक गतीमान व्हावे यादृष्टीने ही पदभरती अतिशय महत्वाची असून ही परीक्षा प्रक्रिया सुरळीत तसेच स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुनियोजित ऑनलाईनरित्या घेण्यात येत असून परीक्षा देणाऱ्या कोणत्याही अर्जदाराने याबाबत कसल्याही भूलथापांना, आमिषांना बळी पडू नये, अशा प्रकारचे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -