घरमुंबईCSMT स्थानकावर प्रवाशांसाठी 'या' सोयीसुविधा उपलब्ध

CSMT स्थानकावर प्रवाशांसाठी ‘या’ सोयीसुविधा उपलब्ध

Subscribe

जेणेकरुन, प्रवाशांना सहजपणे लांब अंतरावरुन प्लॅटफॉर्म क्रमांक दिसू शकतात.

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. प्रवाशांसाठी नवीन दिशा-दर्शके फलक आणि चिन्हांची सुविधा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ८ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ९ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर कींवा जलद गाड्या मार्गस्थ होतात. त्यामुळे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म क्रमांक दर्शविणारे मोठ्या फॉन्टचे दिशा-दर्शके फलक आणि चिन्हांची फलक लावण्यात आले आहेत. जेणेकरुन, प्रवाशांना सहजपणे लांब अंतरावरुन प्लॅटफॉर्म क्रमांक दिसू शकतात.

याशिवाय स्टेशनवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, एस्केलेटर, बॅगेज सॅनिटायझर मशीन इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे जिथून दररोज लाखो प्रवासी ट्रेनमधून ये-जा करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी झोनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ७ वर तीन दिशा-निर्देश बोर्ड आहेत आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ८ ते १८ प्लॅटफॉर्म येथे २ दिशा-निर्देश बोर्ड लावण्यात आले आहेत. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांचा कोणालाही सहजपणे वापर करता येऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात १ एप्रिलपासून नवीन विजेचे दर लागू, कोणाची वीज स्वस्त, कोणाची महाग ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -